Crime
sakal
नाशिक: अंबड औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांच्या कंपनी आवारातील कथित अवैध बांधकामाबाबत एमआयडीसी कार्यालयाकडे तक्रारी करायच्या आणि नंतर एमआयडीसी अधिकाऱ्यांशी संगनमत करून उद्योजकांकडून खंडणी उकळणाऱ्या एका ‘सामाजिक कार्यकर्त्या’ला चुंचाळे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या खंडणीखोराविरोधात पहिला गुन्हा दाखल होताच, आणखी दोन उद्योजकांनी तक्रारी देण्यासाठी पोलिसांत धाव घेतली आहे. संशयित खंडणीखोराला न्यायालयाने शनिवार (ता. २२)पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.