MNGL Gas Leak
sakal
नवीन नाशिक: अंबड येथील फडोळ मळा परिसरात शुक्रवारी (ता. १२) दुपारी दोनच्या सुमारास ‘एमएनजीएल’च्या गॅस पाइपलाइनला गळती लागल्याने संपूर्ण भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले. अत्यंत मोठ्या दाबाने हवा बाहेर पडल्याचा आवाज झाल्याने नागरिकांनी तातडीने परिसर रिकामा करीत पळापळ केली. वाढता गॅस दाब आणि संभाव्य स्फोटाचा धोका पाहता नागरिकांनी पोलिस आणि महापालिकेला वारंवार फोन करून मदत मागितली. मात्र, घटनेनंतर बराच काळ कोणताही जबाबदार अधिकारी घटनास्थळी न पोहोचल्याने स्थानिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.