नाशिक/सिडको- अंबड लिंक रोडवरील महालक्ष्मीनगर परिसरातील स्वामीनगर येथे कामगार युवकाचा संशयितांनी सिनेस्टाइल पाठलाग करीत कोयत्याने वार करीत निर्घृणपणे खून केला. दोन आठवड्यांपूर्वी दुचाकीचा कट लागल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून संशयितांनी खुन्नस काढली. याप्रकरणी अंबड पोलिसांत दोन संशयितांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयितांना अंबड पोलिसांनी अवघ्या दोन तासांत गजाआड केले आहे.