Ambadas Danve
sakal
नाशिक: विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते व शिवसेना (उबाठा) पक्षाचे ज्येष्ठ नेते अंबादास दानवे यांनी नाशिक शहरातील एका आमदाराला भारतीय जनता पक्षाच्याच एका माजी नगरसेवकाने मारण्याची सुपारी दिल्याचे माध्यमांना सांगितल्यावर नाशिकच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. माजी नगरसेवक जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचा समर्थक असल्याचेही त्यांनी सांगताना माजी नगरसेवकावर कारवाई करावी, अशी मागणी केली.