

Nashik Tribal Women Protest
esakal
अंबासन: गावातील अवैध दारूविक्री तातडीने बंद करून संपूर्ण गावात दारूबंदी लागू करावी, या मागणीसाठी शेकडो आदिवासी महिलांनी मंगळवारी (ता. २५) आठवडे बाजाराच्या दिवशी ग्रामपंचायत कार्यालयावर धडक देत संताप व्यक्त केला. ‘गावात दारूबंदी झालीच पाहिजे’, अशी एकमुखी मागणी करीत महिलांनी ग्रामपंचायत प्रशासनाचे लक्ष वेधले.