सेकंडमेन
NSK26H33457
भालोद (ता.यावल) : ‘पाऊलखुणा प्रबोधनाच्या’ कार्यक्रमात मार्गदर्शन करताना प्रा. डॉ. विलास चव्हाण. मंचावर नारायण चौधरी, अरुण चौधरी, शरद परतणे, प्राचार्य डॉ. के. जी. कोल्हे आदी.
-------------------------------
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आधुनिक भारतनिर्मितीचे शिल्पकार
-----
डॉ. विलास चव्हाण : भालोद येथील ‘पाऊलखुणा प्रबोधनाच्या’ कार्यक्रमात मार्गदर्शन
सकाळ वृत्तसेवा
यावल, ता.२४ : व्यक्तीला शिक्षण मिळाले नाही, तर त्याची कौशल्य विकसित होत नाहीत. त्यामुळे त्याच्या आचार-विचारांसह व्यक्तिमत्त्वात माणूस म्हणून उणिवा राहतात. व्यक्ती व समाजाचा विकास करावयाचा असेल, तर शिक्षण हाच व्यक्ती व देशाच्या सर्वांगीण उन्नतीचा एकमेव मार्ग आहे. संविधानाच्या माध्यमातून या देशातील करोडो लोकांना शिक्षणाचा हक्क व अधिकार देणारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आधुनिक भारताच्या निर्मितीचे शिल्पकार ठरतात, असे प्रतिपादन प्रसिद्ध मानवतावादी व आंबेडकरी साहित्य, तत्त्वज्ञान व चळवळींचे अभ्यासक प्रा. डॉ. विलास चव्हाण (धुळे) यांनी केले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भालोद (ता.यावल) येथील न्यू इंग्लिश स्कूलला २२ ऑक्टोंबर १९२९ रोजी तत्कालीन शिक्षण व्यवस्थेच्या पाहणीसाठी नेमलेल्या समितीचे शासकीय सदस्य म्हणून भेट दिली होती, त्या भेटीला गुरुवारी (ता.२२) एकूण ९७ वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त ‘पाऊलखुणा प्रबोधनाच्या’ हा विशेष कार्यक्रम भालोद येथील कला व विज्ञान महाविद्यालयात मराठी व राज्यशास्त्र विभागातर्फे झाला, त्यात प्रमुख वक्ते म्हणून प्रा. चव्हाण बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सेकंडरी एज्युकेशन सोसायटीचे व्हाइस चेअरमन कृषिभूषण नारायण चौधरी, संस्थेचे ज्येष्ठ संचालक अरुण चौधरी, संचालक शरद परतणे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. जी. कोल्हे, मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. जतीन मेढे, राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. सुनील नेवे आदी उपस्थित होते.
डॉ. बाबासाहेब विद्यार्थ्यांचे प्रेरणास्त्रोत
प्राचार्य डॉ. कोल्हे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातील खडतर शैक्षणिक प्रवास सांगून मनस्थिती मजबूत असली की कठीण परिस्थितीही बदलते, हे अनेक उदाहरणे देऊन सागितले. ज्ञानाची आस असलेले डॉ. आंबेडकर हे विद्यार्थ्यांचे प्रेरणास्त्रोत व्हावेत, असे सांगितले. विद्यार्थी प्राध्यापकांसह परिसरातील सामाजिक चळवळीचे अभ्यासक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक प्रा. डॉ. जतीन मेढे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. दिनेश पाटील यांनी केले.