अमित ठाकरे 6 पासून नाशिक जिल्हा दौऱ्यावर | Latest marathi news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Amit Thackeray latest marathi news

अमित ठाकरे 6 पासून नाशिक जिल्हा दौऱ्यावर

नाशिक : राज्यातील बदलत्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने संघटना बळकटीवर भर दिला असून, त्याचाच एक भाग म्हणून मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांचा महासंपर्क अभियानातील तिसरा टप्पा नाशिकमध्ये या आठवड्यात होत आहे. (Amit Thackeray on Nashik district tour from nashik Latest marathi news)

जून महिन्याच्या अखेरपासून राज्यातील राजकीय घडामोडी तीव्र झाल्या आहेत. सत्तांतर होण्याबरोबरच आमदारांची एक संख्या असलेल्या मनसेला महत्त्व प्राप्त झाले आहे. एक आमदार असतानाही मनसेला शिंदे सरकारमध्ये मंत्रिपद मिळेल, अशी शक्यता आहे.

त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाने शिंदे सरकारविरोधात निकाल दिल्यास एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या ४० आमदारांना कुठल्या ना कुठल्या पक्षात सहभागी व्हावे लागणार आहे. त्या अनुषंगाने मनसेचे महत्त्व वाढले आहे. राज्यात जिल्हा परिषद व महापालिकेच्या निवडणुका होत आहेत.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मनसेला यानिमित्त बूस्टर डोस मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर संघटना बळकटीकडे लक्ष दिले जात आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या राजकीय कारकीर्दीची सुरवात विद्यार्थिदशेपासून झाली.

हेही वाचा: बांधकाम विभागातून हिशेबाची कागदपत्रे गायब; गैरव्यवहार लपविल्याचा संशय

एकेकाळी भारतीय विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून शिवसेनेने तरुणांची मोठी फळी निर्माण केली होती. त्याचप्रमाणे मनसेची वाटचाल सुरू आहे. अमित ठाकरे यांच्याकडे विद्यार्थी सेनेची जबाबदारी दिली आहे. राज्यभर दौरे करून विद्यार्थी संघटना बळकट करण्याचे काम ते करीत आहेत. नाशिक मनसेचा बालेकिल्ला.

त्यामुळे नाशिकमध्ये विद्यार्थी संघटना बळकट करण्यासाठी अमित यांचा महासंपर्क अभियानाचा तिसरा टप्पा सुरू होत आहे. या टप्प्यात महाविद्यालयांमध्ये जाऊन ते विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधणार आहेत. विद्यार्थ्यांना मनसे विद्यार्थी संघटनेत सहभागी होण्याचे आवाहनही करणार आहेत.

यासंदर्भात मागील आठवड्यात मनसेचे जिल्हाप्रमुख अंकुश पवार, शहराध्यक्ष दिलीप दातीर व समन्वयक सचिन भोसले यांच्याशी मुंबईत चर्चा झाल्यानंतर दौरा निश्चित करण्यात आला.

...असा आहे महासंपर्क अभियान दौरा

- ६ ऑगस्ट : इगतपुरी, सिन्नर व नाशिक तालुका

- ७ ऑगस्ट : निफाड, येवला, नांदगाव, मालेगाव व चांदवड

- ८ ऑगस्ट : सटाणा- देवळा, कळवण, दिंडोरी, हरसूल, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर

- ९ ऑगस्ट : नाशिक शहर, पूर्व नाशिक, मध्य नाशिक, नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघ

हेही वाचा: नाशिक : सोमेश्‍वरला लोटला भक्तीचा महापूर

Web Title: Amit Thackeray On Nashik District Tour From Nashik Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :NashikRaj Thackeraymns