नाशिक: शहराची वाढती लोकसंख्या आणि आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ३०७ कोटींच्या पाणीपुरवठा योजनेच्या कामाचा श्रीगणेशा झाला आहे. संबंधित ठेकेदार कंपनीला कार्यारंभ आदेश देण्यात आला असून, कुंभमेळ्यापूर्वी म्हणजे दोन वर्षांत कामे पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.