Godavari Pollution
sakal
नाशिक: केंद्र सरकारच्या अमृत-२ योजनेंतर्गत शहरात २२७.१८ कोटी रुपये किमतीचे दोन मलनिस्सारण प्रकल्प राबविले जाणार आहेत. त्या प्रकल्पांना राज्य शासनाने प्रशासकीय मंजुरी दिली आहे. यात १२०.१७ कोटी रुपये खर्च करून नवीन मलवाहिका टाकल्या जाणार आहे, तर १०७ कोटी रुपये खर्च करून जुन्या मलवाहिका बदलल्या जाणार आहेत. या प्रकल्पामुळे शहरातील सांडपाणी निचरा करणारी यंत्रणा अधिक सक्षम होणार असून गोदावरी प्रदूषणमुक्तीला हातभार लागणार आहे.