नाशिक- कुंभमेळ्याच्या निमित्ताने शहरात ८८ किलोमीटर लांबीची मलवाहिका टाकली जाणार असून प्रकल्पासाठी २२७ कोटी रुपये खर्च येणार आहे. केंद्र सरकारच्या अमृत-२ योजनेतून साकारणाऱ्या या प्रकल्पाला राज्य सरकारच्या तांत्रिक समितीने प्रशासकीय मान्यता दिली आहे त्यामुळे लवकरच निविदा प्रसिद्ध होवून कामाला सुरुवात होईल.