Ganesh Visarjan
sakal
नाशिक/ जुने नाशिक: अनंत चतुर्दशीनिमित्त शहरातून काढलेल्या विसर्जन मिरवणुकीत पारंपरिक ढोल-ताशा पथक, बॅन्जोसह डीजेचा दणदणाट झाला. शनिवारी (ता. ७) सकाळी ११ वाजून ३४ मिनिटांनी सुरू झालेल्या मिरवणुकीचा समारोप मध्यरात्री १ वाजून १८ मिनिटांनी झाला. प्रथमच मध्यरात्री बारानंतर पारंपरिक वाद्य वादनाला परवानगी दिली. दिवसभरात अधूनमधून पावसाच्या हलक्या सरींनी गणेशभक्तांचा उत्साह वाढविला. चित्ररथ आकर्षणाचा केंद्र ठरले होते.