नाशिकच्या लेण्यांमध्ये आढळला प्राचीन रोमन खेळाचा पट! सांस्कृतिक दस्तऐवज समोर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

nashik cave

नाशिकच्या लेण्यांमध्ये आढळला प्राचीन रोमन खेळाचा पट! | Nashik

sakal_logo
By
महेंद्र महाजन

नाशिक : प्राचीन काळापासून नाशिकला (nashik) ऐतिहासिक महत्त्व आहे. सातवाहन राजवटीत नाशिक हे एक व्यापारी केंद्र म्हणून प्रसिद्ध होते. वेगवेगळ्या संस्कृतीच्या पाऊलखुणा प्राचीन अवशेषामुळे पुढे येताहेत. ऐतिहासिक दस्तऐवजात भर घालणारा सुमारे दोन हजार वर्षांपूर्वीचा रोमन संस्कृतीतला खेळाचा पट येथील त्रिरश्मी लेण्यांतील लेणी क्रमांक आठमध्ये आढळून आला. येथील एच पी. टी. महाविद्यालयातील इतिहासाचे प्रा. डॉ. रामदास भोंग यांनी हा रोमन सांस्कृतिक दस्तावेज समोर आणलायं.

त्रिरश्‍मी लेण्यांमध्ये रोमन खेळाचा पट

याबाबत डॉ. भोंग म्हणाले, की प्राचीन काळापासून भारताच्या इतिहासात नाशिकचे विशेष महत्त्व आहे. महाराष्ट्रातील प्रथम शासक वंश म्हणजे सातवाहन राजवटीत नाशिक हे महत्त्वाचे व्यापारी केंद्र म्हणून प्रसिद्ध होते. भरोच (गुजरात) ते पैठण आणि नालासोपारा या व्यापारी मार्गावर नाशिकला व्यापारी महत्व द्यायचे. इसवी सनपूर्व दुसऱ्या शतकात व्यापारासाठी निघालेले रोमन व्यापारी नाशिक परिसरात निवाऱ्यासाठी थांबायचे. त्यावेळी खेळ खेळला जायचा. त्यातीलच बारा खुणाचा हा खेळाचा पट असून, रोममध्ये तो लोकप्रिय होता. रोमन व्यापाऱ्यांसमवेत तो भारतात आला.

कसा आहे हा खेळ?

खेळाच्या पटावर बारा चौकोणाच्या जोडीत सहा चौकोणामध्ये एक कलात्मक रेषा असते. त्याला रोम आणि ग्रीसमध्ये पवित्र रेषा म्हणून ओळखले जाते. हा खेळ दोन खेळाडू खेळतात. खेळाचे पुरावे ग्रीस, रोम, बोसनिय, इंग्लंड, तुर्की आदी ठिकाणी आढळून आले आहेत. महाराष्ट्रातील नागपूरजवळ भीवकुंड परिसरातील लेण्यांमध्ये असाच एक पट आढळून आला आहे. या पटात काही सूक्ष्म बदल दिसून येतात. पटातील रेषा काही ठिकाणी फुलांच्या आकाराची आहे. नाशिक येथे ही रेषा बाणांच्या आकाराची आढळून आली. नव्यानेच उजेडात आलेला लेणी क्रमांक आठमधील हा पट काळाच्या ओघात अस्पष्ट झाल्याने त्यावरील मध्य रेषा दिसून येत नाही.

हेही वाचा: नाशिक : कर्मचाऱ्यांच्या वेतनात ठेकेदारांची पाकीटमारी

पटाची साधर्म्यता

नाशिकच्या लेण्यांत सापडलेल्या पटाचे सूक्ष्म निरीक्षण केल्यावर या पटासारखेच साधर्म्य दर्शविणारे वेगवेगळ्या प्रकारचे खेळ वेगवेगळ्या नावाने ओळखले जातात. जपानमध्ये सुनोरोकू, थायलँडमध्ये लेनसाकी आदी नावे या खेळाला आहेत. १२ चौकोणाच्या दोन ओळी व मध्यभागी एक अलंकृत रेषेपासून खेळाची सुरुवात होते.

नाशिकच्या पुरातन आणि ऐतिहासिक वैभवात रोमन संस्कृतीतील पटामुळे भर पडली आहे. अशीच सांकेतिक चिन्हे त्रिरश्‍मी लेण्यांमध्ये निरीक्षण केल्यावर सापडतात. त्याचे संशोधन होणे आवश्यक आहे. इतिहास अभ्यासकांनी प्राचीन अवशेष पुढल्या पिढ्यांसाठी जतन करावे. -प्रा. डॉ. रामदास भोंग. इतिहासाचे अभ्यासक

हेही वाचा: नियमांचा अडसर मात्र, नोकरभरतीला हिरवा कंदील

loading image
go to top