esakal | 'बिन भिंतींची उघडी शाळा, लोखो सोसाव्या लागताय येथे कळा!'..चिमुकल्यांची आर्त हाक...
sakal

बोलून बातमी शोधा

KIKV20A00011_pr[1].jpg

किकवारी खुर्द (ता. बागलाण) येथील काठगव्हाण शिवारातील अंगणवाडीला हक्काची खोली नसल्याने 12 ते 13 वर्षांपासून रस्त्यालगतच्या झाडाखाली अंगणवाडी भरवली जात आहे. मुले कुपोषित राहू नयेत, त्यांना सकस आहार मिळावा, शिक्षणाची गोडी लहानपणापासून लागावी, यासाठी अंगणवाडी सुरू करण्यात आली. किकवारी खुर्द येथील काठगव्हाण शिवारात मोकळ्या जागेत अंगणवाडी भरण्यास सुरवात झाली.

'बिन भिंतींची उघडी शाळा, लोखो सोसाव्या लागताय येथे कळा!'..चिमुकल्यांची आर्त हाक...

sakal_logo
By
अभिमन अहिरे : सकाळ वृत्तसेवा

नाशिक : किकवारी खुर्द (ता. बागलाण) येथील काठगव्हाण शिवारातील अंगणवाडीला हक्काची खोली नसल्याने 12 ते 13 वर्षांपासून रस्त्यालगतच्या झाडाखाली अंगणवाडी भरवली जात आहे. मुले कुपोषित राहू नयेत, त्यांना सकस आहार मिळावा, शिक्षणाची गोडी लहानपणापासून लागावी, यासाठी अंगणवाडी सुरू करण्यात आली. किकवारी खुर्द येथील काठगव्हाण शिवारात मोकळ्या जागेत अंगणवाडी भरण्यास सुरवात झाली. तब्बल 12 ते 13 वर्षांपासून चिमुकल्यांना अंगणवाडीच्या खोलीपासून वंचित राहावे 
लागत आहे. अनेकदा प्रस्ताव देऊनही अंगणवाडीची खोली बांधली जात नसून चिमुकल्यांना हक्काची अंगणवाडीची खोली मिळत नसल्याचे चित्र आहे. 

प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने त्याचा त्रास चिमुकले आणि कर्मचाऱ्यांना 

अंगणवाडीचे नाव काठगव्हाण शिवार आहे. मुले-मुली याच परिसरातील असूनही खोलीचा प्रश्‍न सुटत नसून ऊन, वारा, पाऊस व थंडीच्या दिवसांत चिमुकल्यांना 
उघड्यावरच शिक्षण घ्यावे लागत आहे. सध्या हिवाळ्याचे दिवस आहेत. विद्यार्थ्यांचे संरक्षण करण्यासाठी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची धावपळ होते. याप्रश्‍नी अनेकदा प्रस्ताव देऊनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने त्याचा त्रास चिमुकले आणि कर्मचाऱ्यांना सहन करावा लागत आहे. अंगणवाडीची खोली बांधून मिळाल्यास पटसंख्या वाढेल. एकीकडे शिक्षणाचा सार्वत्रीकरणाचा प्रसार केला जात आहे. शासनाने शून्य ते पाच वयोगटातील मुला-मुलींसाठी प्रत्येक खेडेगावात अंगणवाड्या सुरू केल्या. 
मात्र, काठगव्हाण अंगणवाडीला स्वतंत्र खोली नसल्याने मुलांना झाडाखाली किंवा उघड्यावर बसावे लागत आहे. मुलांसाठी पिण्याचे शुद्ध पाणी नाही. तसेच शौचालयही नाही. अशा अनेक अडचणी येत आहेत. 

क्लिक करा > VIDEO : यमाची काळी सावली पोहोचली पण...आजी अन् नातीची व्यथा..

अंगणवाडी 13 वर्षांपासून झाडाखाली 

काठगव्हाण शिवारातील अंगणवाडी 13 वर्षांपासून झाडाखाली भरत आहे, हे दुर्दैव आहे. शासन बालकांच्या विकासासाठी भरपूर प्रमाणात खर्च करते, पण प्रशासन तिथे अपयशी ठरत आहे. येत्या काही दिवसांत अंगणवाडीचे बांधकाम झाले नाही, तर प्रहार संघटना आंदोलन करणार आहे. -गणेश काकुळते, उपतालुकाप्रमुख, प्रहार संघटना 

बालकांना बसण्यासाठी जागा नसल्याने खूपच गैरसोय

काठगव्हाण शिवारातील अंगणवाडीत बालकांना बसण्यासाठी जागा नसल्याने खूपच गैरसोय होत आहे. कार्यालयामार्फत अंगणवाडीसाठी साहित्य मिळते, ते ठेवण्यासाठी जागा नाही. अंगणवाडीसाठी तत्काळ स्वतंत्र खोली बांधावी. -ज्योती पवार, अंगणवाडी कार्यकर्ती 

हेही वाचा > शाळा झाल्या "दिन''वाण्या अन्‌ विद्यार्थ्यांच्या नजरा केविलवाण्या!..शिक्षकांची दमछाक...

loading image
go to top