esakal | Sakal - Read Latest Breaking Marathi News from Maharashtra India & Around the World
sakal

बोलून बातमी शोधा

malegaon acc old lady.png

मृत्यू समोर उभा ठाकला होता. मात्र आजी-नातवंड या अतूट मायेच्या धाग्यानेच जणू त्यांनी मृत्यूला थोपवून ठेवले आणि आजीसह दोन नातवांचा पुनर्जन्मच झाला. ओले कपडे आणि जीवघेणा अपघात यामुळे तिघेही प्रचंड घाबरले होते. परंतु आपण देवीच्या कृपेनेच वाचलो असे ते पुन्हा पुन्हा सांगत होते. कमल चौथीत तर देवेन्द्र पहिलीत सोनगीर च्या मराठी शाळा न. मध्ये शिकतात. 

VIDEO : यमाची काळी सावली पोहोचली पण...आजी अन् नातीची व्यथा..

sakal_logo
By
मोठाभाऊ पगार : सकाळ वृत्तसेवा

मालेगाव : देव तारी त्यास कोण मारी?असे म्हटले जाते. याचीच प्रचिती मेशी (धोबीघाट) परिसरात झालेल्या विहीर, बस व ऍपे रिक्षा या अपघातात सापडलेल्या आदिवासी गरीब मोरे कुटुंबातील आजी, नात आणि नातू यांना आली. मृत्यूची छाया त्यांच्यासमोर उभी होती. परंतु दैव बलवत्तर हे तिघे अक्षरश: मृत्यूच्या दाढेतून परत आले. 

यमाची काळी सावली पोहोचली..परंतु त्यातून...

घरात अठरा विश्व दारिद्रय असल्याने सोनगीर (जि. धुळे) येथील मोरे कुटुंब कामाच्या शोधात कळवण तालुक्‍यातील पगार कुटुंबियाकडे वीट भट्टीवर कामासाठी आहे. आज (ता.28) मंगळवारी गजराबाई मोरे (60) आपली नात कमल मोरे (10) व नातू देवेंद्र मोरे(6) यांच्या समवेत धुळे - कळवण असा बसचा प्रवास करत असताना पुढे काय वाढून ठेवले आहे, याची पुसटशी कल्पनाही त्यांना नव्हती. बस विहिरीत उभी पडल्याने विहिरीतील पाणी बसमध्ये शिरत होते आणि मोरे कुटुंब देविमातेला आपल्या बचावासाठी विनवणी करीत होते. घटनास्थळी मदत कार्यासाठी आलेल्या देवदूतांनी मोरे कुटुंबियांना बस मध्ये घुसून सुखरूप बाहेर काढले. सुदैवाने तिघे बचावले. यमाची काळी सावली मोरे कुटुंबियांपर्यंत पोहोचली असतांना ते त्यातून बचावले.

हेही वाचा >  PHOTO : ह्रदयद्रावक! "आई मला भुक लागलीय" अडीज महिन्याचा तान्हुला शोधतोय आईला.. कारण...

मृत्यू समोर उभा ठाकला होता. मात्र आजी-नातवंड या अतूट मायेच्या धाग्यानेच जणू त्यांनी मृत्यूला थोपवून ठेवले आणि आजीसह दोन नातवांचा पुनर्जन्मच झाला. ओले कपडे आणि जीवघेणा अपघात यामुळे तिघेही प्रचंड घाबरले होते. परंतु आपण देवीच्या कृपेनेच वाचलो असे ते पुन्हा पुन्हा सांगत होते. कमल चौथीत तर देवेन्द्र पहिलीत सोनगीर च्या मराठी शाळा न. मध्ये शिकतात. 
 
हेही वाचा > 'ज्यांना' संकटग्रस्त अबला 'तो' समजत होता...त्या तर चक्क...विश्वास नांगरे पाटलांचा फंडा यशस्वी! 

go to top