Anil Kadam : बिनविरोधाचा प्रस्ताव आल्यास स्वीकारू : अनिल कदम

Institutions created to maintain the power of the market committee were invalidated by the government, former MLA Kadam's criticism of MLA Bankar
Institutions created to maintain the power of the market committee were invalidated by the government, former MLA Kadam's criticism of MLA Bankaresakal

पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) : आमदार दिलीप बनकर यांनी सत्ता व पदाचा दबाव आणून पिंपळगाव बाजार समितीची सत्ता टिकवण्यासाठी कार्यक्षेत्रात सहा संस्था निर्माण केल्या. बिनविरोधचा प्रस्ताव आला तर स्वीकारू पण खांदेपालट व्हावी.

गत वेळी त्यांना सत्ता बिनविरोध दिली. आता आमच्या हाती बाजार समितीचे कामकाज दिले तर बिनविरोधची पुनरावृत्ती होईल. निवडणूक सर्व ताकदीनिशी लढून जिंकणार असल्याचा विश्वास माजी आमदार अनिल कदम यांनी व्यक्त करताना आमदार बनकर यांच्यावर टीका केली. (Anil Kadam statement on pimpalgaon baswant market committee election criticism on bankar nashik news)

पिंपळगाव सोसायटीच्या सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सरपंच भास्करराव बनकर, मविप्र माजी संचालक दिलीप मोरे, गोकुळ गीते, राजेश पाटील आदी उपस्थित होते.

अनिल कदम म्हणाले, धनशक्तीचा वापर करून त्या संस्थेच्या माध्यमातून स्वत:चे समर्थक असलेले ७८ मतदार बाजार समितीच्या निवडणुकीत मतदार यादीत घुसण्याचा केविलवाणा प्रयत्न केला.

त्या विरोधात मी संघर्ष करून त्या बेकायदा संस्था शासनाकडून अपात्र ठरविल्या आहेत. न्यायालयाने त्या पुढील सुनावणी पर्यंत ती नावे वगळण्याच्या निर्णय दिला आहे. न्यायालयाच्या पुढील सुनावणीत त्या संस्थांचे ७८ संचालक अपात्रच ठरतील.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

Institutions created to maintain the power of the market committee were invalidated by the government, former MLA Kadam's criticism of MLA Bankar
Flu Treatment : फ्लू पासून दूर राहायचंय? मग जाणून घ्या हे उपचार

सर्व पदे स्वतःसाठीच हवी या प्रवृत्ती विरोधात निफाड तालुक्याची विविध पक्षाच्या नेत्यांची मोट बांधली गेली आहे. निवडणुकीत परिवर्तन निश्चित असून तालुक्याच्या राजकारणाला ही निवडणूक कलाटणी देणारी ठरेल.

सरपंच भास्करराव बनकर यांनी माजी आमदार कदम यांच्या नेतृत्वाखालील पिंपळगाव बाजार समितीत सत्ता परिवर्तन निश्चित असल्याचा विश्वास व्यक्त केला. बाजार समितीचे माजी संचालक गोकुळ गीते म्हणाले, बेकायदेशीर पद्धतीने नोंदविलेल्या संस्थांना शासनाने स्थगिती दिली आहे.

Institutions created to maintain the power of the market committee were invalidated by the government, former MLA Kadam's criticism of MLA Bankar
Market Committee Election: सन्मानपूर्वक जागावाटप झाल्यास महाविकास आघाडी; अन्यथा शिवसेना स्वबळावर लढणार!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com