Market Committee Election: सन्मानपूर्वक जागावाटप झाल्यास महाविकास आघाडी; अन्यथा शिवसेना स्वबळावर लढणार!

Speaking at a meeting of Shiv Sena aspirants, MLA Narendra Darade. Neighbor Sambhaji Pawar. Officials present in front
Speaking at a meeting of Shiv Sena aspirants, MLA Narendra Darade. Neighbor Sambhaji Pawar. Officials present in frontesakal

येवला (जि. नाशिक) : कृषी उत्पन्न बाजार समिती पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला ५० टक्के जागावाटप केल्यास शिवसेना महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जाईल अन्यथा बाजार समिती निवडणूक शिवसेना स्वतंत्र पॅनलची निर्मिती करून निवडणूक लढविणार असल्याची भूमिका शिवसेना पदाधिकाऱ्यांनी बैठकीत मांडली. (Maha Vikas Aghadi in case of honorable seat allocation Otherwise Shiv Sena will fight solo Market Committee Election nashik news)

येवला येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात शिवसेनेतर्फे बाजार समिती निवडणूक लढविणाऱ्या इच्छुक उमेदवारांची बैठक आमदार नरेंद्र दराडे, सहसंपर्कप्रमुख संभाजीराजे पवार, शिवसेना जिल्हाप्रमुख कुणाल दराडे आदींच्या प्रमुख उपस्थितीत झाली.

आमदार दराडे म्हणाले, तालुक्यातील विकास संस्थेमध्ये व ग्रामपंचायतीमध्ये शिवसेनेचे बहुसंख्य सदस्य निवडून आलेले असून शिवसेनेची ताकद तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. शिवसेनेला योग्य जागा बाजार समिती निवडणुकीत मिळाव्यात अशी आग्रही मागणी केली.

शिवसेना नेते संभाजी पवार यांनी आगामी बाजार समिती निवडणूकीसाठी शिवसेना पक्षाचे वरिष्ठ नेते, पदाधिकारी जो आदेश देतील त्या आदेशाचे आम्ही पालन करून निवडणूक लढविणार असल्याचे सांगितले. जिल्हाप्रमुख कुणाल दराडे यांनी बाजार समिती निवडणुकीत सर्वांना बरोबर घेऊन शिवसैनिकांना या निवडणुकीमध्ये उमेदवारी करण्याची संधी देणार असल्याचे यावेळी सांगितले.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

Speaking at a meeting of Shiv Sena aspirants, MLA Narendra Darade. Neighbor Sambhaji Pawar. Officials present in front
DPDC : सर्व्हर अडचणीनंतर शंभर टक्के निधी खर्च : डीपीडीसी

निवडणूक लढविणाऱ्या सर्व इच्छुक उमेदवारांची मते जाणून घेऊन इच्छुक उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करावा अशा सूचना इच्छुक उमेदवारांना बैठकीत देण्यात आल्या. सोसायटी, ग्रामपंचायत, व्यापारी व हमाल मापाडी गटातून सुमारे ६० ते ६५ इच्छुक उमेदवारांनी आम्ही शिवसेनेकडून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असल्याचे यावेळी सांगितले.

या वेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख भास्कर कोंढरे, झुंजार देशमुख, तालुकाप्रमुख रतन बोरणारे, शहर प्रमुख राजेंद्र लोणारी, वाल्मीक गोरे, प्रवीण गायकवाड, कांतिलाल साळवे, विठ्ठल आडसरे, दीपक जगताप, छगन आहेर, पुंडलिक पाचपुते, बाळासाहेब पिंपरकर, चंद्रकांत शिंदे, जनार्दन पागिरे, अरुण शेलार, विठ्ठल पिंपळे, गणेश पेंढारी, तुळशीराम घनघाव,

अमोल सोनवणे, भागिनाथ थोरात, अशोक आव्हाड, विठ्ठल महाले, बापूसाहेब गायकवाड, अनंता आहेर, नितीन दराडे, दत्तात्रय देवरे, दत्ता काळे, किरण ठाकरे, साहेबराव बोराडे, चंद्रभान नाईकवाडे, जनार्दन भवर, भाऊराव कुदळ, सागर शेलार, भरत बोंबले, रंगनाथ भोरकडे आदी पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते.

Speaking at a meeting of Shiv Sena aspirants, MLA Narendra Darade. Neighbor Sambhaji Pawar. Officials present in front
Flu Treatment : फ्लू पासून दूर राहायचंय? मग जाणून घ्या हे उपचार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com