दिगंबर पाटोळे : वणी- दिंडोरी तालुक्यातील सलाइनवर गेलेले पशुवैद्यकीय केंद्रांची परिस्थिती गेल्या सात ते आठ वर्षांनंतर पूर्वपदावर येत आहे. तालुक्यातील वीस पशुवैद्यकीय केंद्रांचे रुपडे आता पालटू लागले आहे. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त जागा भरल्या गेल्या असल्या तरी पशुधन पर्यवेक्षकाच्या तीन, तर परिचरपदाच्या ११ जागा रिक्त असल्याने पशुवैद्यकीय सेवेवर याचा परिणाम होत आहे.