Anna Bhau Sathe Jayanti: पावसाच्या सरीत जयंती मिरवणूक; जुने नाशिकसह विविध भागातील 5 चित्ररथांचा समावेश

Anna Bhau Sathe Jayanti
Anna Bhau Sathe Jayantiesaka

Anna Bhau Sathe Jayanti : पावसाच्या सरीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणूक मंगळवारी (ता. १) उत्साहात झाली. बागवानपुरा येथून काढण्यात आलेल्या मिरवणुकीत जुने नाशिकसह शहराच्या विविध भागातील ५ चित्ररथांचा समावेश होता. (anna bhau sathe Jayanti procession in rain Including 5 Chitrarathas from different areas including Old Nashik)

मंगळवारी सर्वत्र लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती सर्वत्र साजरी करण्यात आली. परंपरेनुसार सायंकाळी साडेसहाच्या सुमारास बागवानपुरा ते त्र्यंबक रोड येथील अण्णाभाऊ साठे पुतळ्यापर्यंत मिरवणूक काढण्यात आली.

भद्रकाली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून मिरवणुकीस सुरवात झाली. जुने नाशिकसह शहराच्या विविध भागातील जयंती उत्सव साजरे करणाऱ्या पाच मंडळ मिरवणुकीत सहभागी झाले होते.

जयंतीनिमित्ताने पोलिसांकडून अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. बागवानपुरा, चौक मंडई, फाळके रोड, दूध बाजार, भद्रकाली, गाडगे महाराज चौक, मेनरोड, धुमाळ पॉइंट, सांगली बँक सिग्नल, शालिमार, खडकाळी सिग्नल मार्गे मिरवणूक काढण्यात येऊन त्र्यंबक रोडवरील अण्णाभाऊ साठे पुतळा येथे समारोप करण्यात आला.

भरपावसात वाद्याच्या तालावर कार्यकर्त्यांनी नृत्य सादर करत मिरवणुकीचा आनंद घेतला. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना नोव्हेंबर २०२२ मध्ये डिलीट अर्थात डॉक्टर पदवी बहाल करण्यात आली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Anna Bhau Sathe Jayanti
Anna Bhau Sathe: श्रमशक्तीचे गाणे ते गात, श्रमिकांमध्ये विश्‍वासाची ज्योत पेटवणारे अण्णा भाऊ साठे म्हणजे सच्चे लोकलेखक

त्यामुळे यंदाच्या मिरवणुकीत सहभागी झालेल्या चित्ररथांवर लावण्यात आलेल्या फलकांवर डॉ. अण्णाभाऊ साठे नावाचा उल्लेख करण्यात आला होता. प्रत्येक शुभेच्छा फलकांवर याच नावाचा उल्लेख करण्यात आलेला दिसला.

याशिवाय संयुक्त महाराष्ट्र तसेच सामाजिक आशियाचे चित्र दर्शविणारे फलकांचेही चित्ररथांवर समावेश होता. सर्व राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची मिरवणुकीकडे पाठ झाल्याचे चित्रही यावेळी दिसून आले.

तरुण मित्रमंडळ, मातंगवाडा जुने नाशिक, जय लहूजी मित्रमंडळ, भीमवाडी गंजमाळ, क्रांतिवीर लहूजी बहुउद्देशीय संस्था, पंचवटी, जय लहूजी मित्रमंडळ, राजीवनगर, रामसेतू मित्रमंडळ पंचवटी आदी मंडळ मिरवणुकीत सहभागी झाले.

Anna Bhau Sathe Jayanti
Anna Bhau Sathe : अण्णा भाऊ साठेंचे विचार समाजासाठी प्रेरणादायी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com