Potholes on the road at Ganjmal signal.
Potholes on the road at Ganjmal signal.esakal

अण्णाभाऊ साठे चौक ते गंजमाळ सिग्नल खड्डेमय!

जुने नाशिक : जीपीओ रोड अण्णाभाऊ साठे चौक ते गंजमाळ सिग्नल रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. जागोजागी मोठे खड्डे पडले असून, यामुळे वाहनचालकांची तारांबळ उडत आहे. याशिवाय खड्ड्यांमुळे अपघातास निमंत्रण मिळत आहे. एका पावसात खड्डे बुजविले की दुसऱ्या दिवसाच्या पावसात पुन्हा रस्त्यावर मोठे खड्डे पडण्याचे प्रकार घडत आहे. (Annabhau Sathe Chowk to Ganjmal signal potholes nashik Latest Marathi News)

महापालिकेकडून खड्डे बुजवण्याच्या काम पाऊस सतत पोलखोल करत आहे. तरीदेखील वरिष्ठ अधिकाऱ्यांना गांभीर्य कळत नसल्याने खड्डे बुजवण्याच्या बाबतीत ‘येरे माझ्या मागल्या’ असे प्रकार घडत आहे.

अशा प्रकारचे दृश्य शहरभर दिसत आहे. परंतु, उत्तम उदाहरण म्हणजे जीपीओ रोड अण्णाभाऊ साठे चौक ते गंजमाळ सिग्नलपर्यंतचा परिसर तसेच सुंदर नारायण मंदिर ते रविवार कारंजापर्यंतचा रस्ता.

जीपीओ ते सिग्नलपर्यंत मोठे खड्डे पडून त्यातील कच आणि दगड बाहेर पडले आहे. त्यामुळे खड्डे अपघातास निमंत्रण देतच आहे. त्याचबरोबर कच आणि दगडांमुळेदेखील अपघातही घडत आहे.

सिग्नलवरील रस्त्यावर इतक्या मोठ्या प्रमाणावर खड्डा झाला आहे की, त्यात पावसाचे पाणी साचून तळे निर्माण झाले आहे. याच रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी कोटी रुपयांचा खर्च झाल्याची माहिती समोर आली आहे.

Potholes on the road at Ganjmal signal.
पंकजा यांच्या भावनांचा पक्षश्रेष्ठी विचार करतील : रावसाहेब दानवे

इतक्या मोठ्या प्रमाणात रक्कम खर्च करूनदेखील रस्त्यांना लगेच खड्डे पडत आहे. अशीच परिस्थिती सुंदर नारायण मंदिर ते रविवार कारंजा रस्त्याची झाली आहे. या रस्त्यावरही मोठी वाहतूक असल्याने एका पावसात बुजवलेले खड्डे दुसऱ्या दिवशीच्या पावसात उघड होत आहे.

मोठी दुर्घटना होण्यापूर्वी महापालिकेने नियोजनबद्ध पद्धतीने खड्डे बुजविण्यात यावे. तसेच रस्ते तयार करण्यापूर्वीदेखील योग्य नियोजन ठेवत दर्जेदार रस्ते तयार करण्यात यावे, अशा प्रतिक्रिया नागरिकांकडून देण्यात आल्या.

Potholes on the road at Ganjmal signal.
पौरोहित्‍यातही महिलाराज : पूजकाचे समाधान हीच खरी पावती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com