Punjab Mail Anniversary : ‘पंजाब मेल’ला 111 वर्षे पूर्ण

Punjab Mail Anniversary
Punjab Mail Anniversaryesakal

Punjab Mail Anniversary : भारतातील सर्वात जुन्या ब्रिटिशांनी सुरू केलेल्या मुंबई-फिरोजपूर दरम्यान धावणाऱ्या पंजाब मेलला गुरुवारी (ता. १) १११ वर्ष पूर्ण झाली. १ जून १९१२ ला ब्रिटिशांनी ही गाडी सुरू केली होती.

या सेवेला १११ वर्ष पूर्ण होत असल्याबद्दल मध्य रेल्वे प्रशासनातर्फे मुंबईतील सीएसटी स्थानकावर केक कापून गाडीचा वाढदिवस साजरा केला जाणार असल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. (Anniversary ​​111 years of Punjab Mail nashik news)

समुद्रामार्गे जहाजाने भारतात येणाऱ्या ब्रिटिश अधिकाऱ्यांना व त्यांच्या परिवाराला या गाडीने लाहोर मार्गे पाकिस्तानातील पेशावर शहरात आणले जात होते. मुंबईहून सुटल्यानंतर ही गाडी कल्याण, नाशिक रोड, मनमाड, चाळीसगाव, जळगाव, भुसावळ, बुरहानपूर, भोपाळ मार्गे ही गाडी फिरोजपूर स्टेशनकडे रवाना होत होती.

एकूण २ हजार ४९६ किलो मीटरचा प्रवास करत ही गाडी पेशावरला पोचत होती. स्वातंत्र्यानंतर फिरोजपूर पर्यंतच गाडी धावत आहे. कोळशाच्या इंजिनवर चालविण्यात येणारी ही गाडी १९६४ पर्यंत कोळशावरच धावली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Punjab Mail Anniversary
Kirit Somaiya : अब कि बारी रवींद्र वायकर...: किरीट सोमय्या

यानंतर काही वर्ष डिझेलचे इंजिन आणि आता इलेक्ट्रिक इंजिनवर या गाडीचा प्रवास सुरू आहे. पंजाब मेल या गाडीला सुरवातीला ६ बोगी होत्या. या गाडीच्या बोगींची संख्या २४ पर्यंत आली आहे.

सध्या ही गाडी मुंबईहून दररोज सायंकाळी साडेसातला पंजाबच्या दिशेने रवाना होते. सहा राज्यातून १ हजार ९३३ किलो मीटरचा प्रवास करून तिसऱ्या दिवशी फिरोजपूर कैंट अर्थात पंजाब प्रांतात पोचते.

"भारतातील सर्वांत जुनी असलेली पंजाब मेल १११ वर्षे पूर्ण करत असल्याचा अभिमान आहे. कोरोना काळ वगळता आतापर्यंत निरंतर ही सेवा सुरू आहे."

- डॉ. शिवराज मानसपुरे, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे.

Punjab Mail Anniversary
हेल्थ इज वेल्थ : हेल्मेट वापरा, सुंदर चेहरा-जबडा वाचवा!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com