पिंगळे गटाकडून ‘आपला पॅनल’ची घोषणा | Nashik | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नाशिक : पिंगळे गटाकडून ‘आपला पॅनल’ची घोषणा

नाशिक : पिंगळे गटाकडून ‘आपला पॅनल’ची घोषणा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : नाशिक बाजार समितीच्या निवडणुकीची तारीख जाहीर झाली असली तरी खऱ्या अर्थाने निवडणुकीच्या मोर्चेबांधणीला सुरवात झाली आहे. बुधवारी (ता.१७) सत्ताधारी पिंगळे गटाने हक्काचे मतदान असलेल्या हरसूल येथे सहविचार सभा आयोजित करून ‘आपला पॅनल’ ची घोषणा केली. आमदार हिरामण खोसकर यांच्या हस्ते एकप्रकारे प्रचाराचा नारळ फोडून सर्वांनाच धक्का दिला आहे. या वेळी पेठ, हरसूलवासीयांनी विद्यमान सभापती देवीदास पिंगळे यांना बिरसा मुंडा यांची मूर्ती भेट देत या भागातील जनाधार हा पिंगळे गटाच्याच पाठीशी भक्कमपणे उभा असल्याचाही शब्द दिला आहे.

या सभेस संचालक संपतराव सकाळे, बहिरू पाटील मुळाणे, पुंडलिक साबळे, भिका पाटील महाले, मनोहर चौधरी, भास्करराव गावित, नामदेव हलकांदर, समधान बोडके, मुख्तार सय्यद, देविदास जाधव, मिथुन राऊत, दामोदर राऊत, रामदास वाघेरे, अरुण काशीद, हरिभाऊ बोडके, बाळासाहेब म्हस्के, विलास कड, विलास कांडेकर, दिलीप थेटे, तुकाराम पेखळे, रवींद्र भोये, संजय तुंगार, विश्वास नागरे, विनायक माळेकर, युवराज कोठुळे, विष्णूपंत म्हैसधुणे, नामदेव गायकर, अर्जुन मौले, मधुकर पाखणे, मंगळू निंबारे, गोकुळ बट्टासे, पेठ हरसूल येथील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सरपंच, उपसरपंच, सदस्य उपस्थित होते.

हेही वाचा: कोणतेही कागदपत्र नसणाऱ्या 18 वर्षावरील लाभार्थ्यांसाठी 19 ला लसीकरण

"देवीदास पिंगळे यांच्या पॅनलमध्ये काम करण्याची यापूर्वीदेखील मला इच्छा होती. परंतु, मला काही लोक येऊ देत नव्हते. आता मात्र, देवीदास पिंगळे यांच्यासारखा संयमी आणि विकास साधणाऱ्या नेत्यांसोबत आपण काम करणार आहोत."

- संपतराव सकाळे, संचालक तथा माजी सभापती

loading image
go to top