Nashik News: ‘सह्याद्री फार्म्स’ची वर्षात उलाढाल एक हजार सात कोटींची : विलास शिंदे

२०२२-२३ मध्ये २८ टक्क्यांनी व्यवसायवृद्धी
Sahyadri Farms
Sahyadri Farmsesakal

Nashik News : देशातील फलोत्पादनातील आघाडीच्या ‘सह्याद्री फार्म्स’ने २०२२-२३ मध्ये मागील वर्षीपेक्षा २८ टक्के अधिक व्यवसायवृद्धी केली. तसेच वर्षात एक हजार सात कोटींची उलाढाल केली आहे.

कंपनीची तेराव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ‘सह्याद्री फार्म्स’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे यांनी ही माहिती दिली. कंपनीचे दोन हजार शेतकरी सभासद, संचालक व कर्मचारी उपस्थित होते. (Annual turnover of Sahyadri Farms one thousand seven crores Vilas Shinde Nashik News)

मोहाडी (ता. दिंडोरी) येथील सह्याद्री फार्म्स ही द्राक्ष उत्पादन व निर्यातीतील, तसेच टोमॅटो प्रक्रियेतील देशातील प्रथम क्रमांकाची कंपनी आहे. कंपनीने हे स्थान गेल्या सात वर्षांपासून सातत्याने राखले.

व्यवसायात ‘सह्याद्री’ने जागतिक दर्जाची प्रमाणके आणली असून, जागतिक द्राक्ष बाजारात स्थान निर्माण केले आहे. याशिवाय डाळिंब, केळी, आंबा, संत्रा, काजू, स्वीटकॉर्न या पिकांतही ‘सह्याद्री फार्म्स’ कार्यरत आहे.

विविध पिकांतील २४ हजार ५०० शेतकरी थेट कंपनीशी जोडले आहेत. २०१२ मध्ये १३ कोटी उलाढाल असलेल्या ‘सह्याद्री फार्म्स’ने मार्च २०२३ अखेर उलाढालीचा एक हजार कोटींचा टप्पा पार केला.

‘सह्याद्री फार्म्स’ला जोडून अन्य ४८ शेतकरी उत्पादक कंपन्या संलग्न आहेत. त्यांच्यातर्फे विविध फलोत्पादन आणि प्रक्रिया प्रकल्पांवर काम सुरू आहे.

‘सह्याद्री फार्म्स’शी संलग्न असलेल्या शेतकऱ्यांच्या ४० हजार एकर क्षेत्रातून येणाऱ्या दोन लाख ७५ हजार ३२७ टन उत्पादनावर प्रक्रिया व निर्यात केली गेली.

निर्यातीतून सुमारे रुपये ३५२ कोटी, देशांतर्गत बाजारपेठेतून ६५५ कोटी उत्पन्न, अशी उलाढाल झाली. त्यामध्ये ताज्या फळांची विक्री प्रमाण ५३ टक्के, प्रक्रियायुक्त उत्पादने प्रमाण ४७ टक्के आहे.

कंपनीकडे एकूण ५६ कोटी रुपयांचे भागभांडवल, राखीव निधी रुपये २५६ कोटी आहे. शेतकऱ्यांच्या मालकीच्या कंपनीने ५५८ कोटींच्या पायाभूत सुविधा उभारल्या आहेत. तसेच सुमारे तेराशे पूर्णवेळ रोजगार व चार हजार हंगामी रोजगार यातून निर्माण करण्यात कंपनीला यश आले.

Sahyadri Farms
NMC News: N-CAP निधीतून त्र्यंबक रोड होणार मॉडेल! वाहतूक कोंडी टळणार

गेल्या वर्षभरातील निर्यात (आकडे टनामध्ये दर्शवितात)

- टोमॅटोप्रक्रिया : एक लाख ५० हजार २००

- द्राक्षे : ४८ हजार ७०६

- आंबा : २६ हजार २८०

- केळी : २४ हजार १०४

- स्वीटकॉर्न : पाच हजार ३००

- इतर फळे : २० हजार

"फलोत्पादनातील मूल्यसाखळी विकसित करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. मागील १२ वर्षांपासून ही वाटचाल सुरू असून, ती एका महत्त्वाच्या टप्प्यावर आली आहे. त्यातून एक आत्मविश्‍वास प्राप्त झाला आहे. देशाने दूध क्षेत्रात उत्पादन व वितरणाच्या बाबतीत जशी जागतिक पातळीवर स्वतःची ओळख निर्माण केली. आम्ही त्याच पद्धतीने फलोत्पादन क्षेत्रात काम करण्याचा प्रयत्न करत आहोत. शेतीक्षेत्रात एकत्र येत निश्‍चित दिशा ठेवून सातत्यपूर्ण प्रयत्नांसह काम करायला वाव आहे. त्यातून महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील ध्येयनिष्ठ तरुण शेतकऱ्यांना नक्कीच प्रेरणा मिळेल."

- विलास शिंदे, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, सह्याद्री फार्म्स

Sahyadri Farms
NMC News: जितकी झाडे जगली तेवढेच पैसे..! पावसाळ्यानंतर महापालिकेची वृक्षारोपण मोहीम

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com