Diploma नोंदणीसाठी पुन्‍हा मुदतवाढ | Latest Marathi News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

admission latest marathi news

Diploma नोंदणीसाठी पुन्‍हा मुदतवाढ

नाशिक : विविध पदविका (डिप्‍लोमा) अभ्यासक्रमांच्‍या नोंदणीला पुन्‍हा एकदा मुदतवाढ मिळालेली आहे. त्‍यानुसार दहावीनंतरच्‍या अभियांत्रिकी व तंत्रशिक्षण पदविका अभ्यासक्रमाची नोंदणी ४ ऑगस्‍टपर्यंत करता येईल. बारावीनंतरच्‍या विविध पदविका अभ्यासक्रमांच्‍या नोंदणीसाठी ५ ऑगस्‍टपर्यंत मुदत असणार आहे. (Another extension for Diploma registration Nashik Latest Marathi News)

शैक्षणिक वर्ष २०२२-२३ च्‍या प्रवेशासाठीची प्रक्रिया तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत राबविली जाते आहे. प्रवेश प्रक्रियेत सहभागासाठी ऑनलाइन नोंदणी करणे आवश्‍यक आहे. त्‍यासाठी पाचव्‍यांदा मुदतवाढ दिलेली आहे.

ही प्रक्रिया २ जूनपासून सुरु असून, टप्‍याटप्‍याने मुदतवाढ देण्याचा निर्णय डीटीईमार्फत घेण्यात आलेला आहे. या वाढीव मुदतीमध्ये आत्तापर्यंत नोंदणी न केलेल्‍या विद्यार्थ्यांना ऑनलाइन नोंदणी करता येईल. या आधी नोंदणी केलेल्‍या विद्यार्थ्यांना कागदपत्रांच्‍या स्‍कॅन छायाप्रती अपलोड करणे, कागदपत्रे पडताळणी करणे, अर्ज निश्‍चित करणे, ही प्रक्रिया वाढीव मुदत पूर्ण करता येणार आहे.

अर्जाच्‍या मुदतीत बदल झाल्‍याने पुढील संपूर्ण प्रक्रियेतही बदल होणार आहे. त्‍यानुसार दहावीनंतरच्‍या पदविका अभ्यासक्रमाची तात्‍पुरती गुणवत्ता यादी ६ ऑगस्‍टला प्रसिद्ध करण्याचे नियोजित आहे. यासंदर्भात हरकती, तक्रार नोंदविण्याची ८ ऑगस्‍टपर्यंत मुदत असेल. ९ ऑगस्‍टला अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्याचे सध्याच्‍या वेळापत्रकानुसार निर्धारीत केले आहे.

हेही वाचा: NMC Election : प्रभाग रचना बदलाच्या हालचाली

अंतिम गुणवत्ता यादी १० ला

बारावीनंतर औषधनिर्माणशास्‍त्र (डी.फार्मसी) यांसह कोटींग ॲण्ड सरफेस टेक्‍नॉलॉजी आणि हॉटेल मॅनेजमेंट ॲण्ड केटरींग टेक्‍नॉलॉजी या अभ्यासक्रमांचे पर्याय उपलब्‍ध आहेत. प्रवेश नोंदणीची मुदत ५ ऑगस्‍टपर्यंत वाढविली आहे.

७ ऑगस्‍टला प्रारुप गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल. हरकती नोंदविण्यासाठी ९ ऑगस्‍टपर्यंत मुदत देतांना १० ऑगस्‍टला अंतीम गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्याचे नियोजित आहे.

हेही वाचा: ‘BARTI’च्या परीक्षेत प्रवेशपत्रावरून गोंधळ

Web Title: Another Extension For Diploma Registration Nashik Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :NashikeducationDiploma