
नाशिक : नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मोठी कारवाई करत मोटार वाहन निरीक्षक आणि दोन खाजगी व्यक्तींना ५०० रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले. पेठ चेक पॉइंटवर प्रवासी बसच्या ई-चलनासाठी २,००० रुपयांची मागणी करण्यात आली होती, मात्र तडजोडीनंतर ५०० रुपये स्वीकारले जात असताना एसीबीच्या पथकाने आरोपींना अटक केली. या प्रकरणी आरटीओ अधिकाऱ्यासह दोघा खाजगी व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.