Devidas Pingle
sakal
पंचवटी: तालुका उपनिबंधकांनी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील कथित गैरव्यवहारांबाबत सादर केलेला अहवाल अपूर्ण व बेकायदेशीर असल्याचा आरोप करत माजी सभापती देवीदास पिंगळे यांनी जिल्हा उपनिबंधकांकडे तक्रार केली होती. त्यानंतर जिल्हा उपनिबंधकांनी या अहवालास तत्काळ स्थगिती देत फेरचौकशीचे आदेश दिले आहेत. वस्तुस्थिती स्पष्ट करण्यासाठी विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे.