Agricultural Market
sakal
नाशिक: वार्षिक ८० हजार टनांपेक्षा अधिक उलाढाल आणि दोनपेक्षा जास्त राज्यांतील कृषी मालाचा लिलाव करणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांना राज्य शासनाने ‘राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार’ असा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी ८ ऑक्टोबर २०२५ ला जारी केलेल्या अध्यादेशानुसार नाशिक, नवी मुंबई, सोलापूर, नागपूर, पुणे आणि लातूर येथील बाजार समित्यांना हा दर्जा बहाल करण्यात आला आहे.