नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे माजी आमदार व प्रदेश उपाध्यक्ष डॉ. अपूर्व हिरे यांच्या भारतीय जनता पक्ष प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला असून, येत्या बुधवारी (ता. २) मुंबई येथे भाजपच्या प्रदेश कार्यालयात दुपारी बाराला डॉ. हिरे यांचा समर्थक कार्यकर्ते, पदाधिकारी, आजी- माजी नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अनेक पदाधिकाऱ्यांसह पक्षप्रवेश होत आहे.