‘दोन मिनिटांत कर्ज’ पडेल महागात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nashik Fake App News

‘दोन मिनिटांत कर्ज’ पडेल महागात

लासलगाव (जि. नाशिक) : ‘ऑनलाइन कागदपत्रे द्या आणि दोन ते तीन मिनिटांत कर्ज मंजूर करून घ्या’, अशा जाहिराती करणाऱ्या मोबाईल अॅपपासून (Mobile Application) सावध राहण्याचा इशारा लासलगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांनी केले आहे. लॉकडाउननंतर (Lockdown) अशा कर्ज देऊ करणाऱ्या मोबाईल अॅपची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून, याद्वारे फसवणूकही (Fraud) होत असल्याच्या अनेक तक्रारी शहरी भागात येत होत्या. आता या ठग्यांनी आपला मोर्चा ग्रामीण भागाकडे वळविला असून, गेल्या काही दिवसांमध्ये अशा तक्रारी येत आहेत.

संबंधित फसवणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात तरुणवर्ग बळी पडत आहे. फेसबुक (Facebook) किंवा इतर सोशल मीडियावर (Social media) अल्पावधीत लोनबाबत विविध जाहिराती येत असतात. त्यामध्ये फसवणूक करणाऱ्यांकडून गुगल प्ले स्टोअरवरून (Google Play store) एक ॲप डाउनलोड (App Download) करण्यास सांगतात. ज्या वेळी आपण ते ॲप डाउनलोड करतो त्यानंतर आपल्याकडून आपल्या मोबाईलमधील सर्व माहितीचा एक्सेस घेत असतात. केवळ आधारकार्ड (Adhar card) व मोबाईल नंबरवरील ओटीपीवरून (OTP) तत्काळ दहा हजारांपासून कर्ज प्राप्त होते. नागरिक घेतलेले कर्ज फेडतात. परंतु फसवणूक करणारे पुन्हा फोन करून अधिक पैशांची मागणी करतात. शिवीगाळ, दमदाटी केली जाते.

हेही वाचा: Womens Cricket : 'BCCI'च्या शिबिरासाठी ईश्वरी सावकारची निवड

त्यानंतरसुद्धा पैसे न भरल्यास आपल्या फोन बुकमधील सेव्ह असलेल्या नातेवाईक व मित्र यांना फोन, मेसेज करून लोन (Loan) घेणाऱ्यांची बदनामी केले जाते. यानंतरसुद्धा पैसे न भरल्यास फोटो गॅलरीमधील कुटुंबातील महिलांचे फोटो अश्लील मॉर्फिंगकरून फोनमध्ये सेव्ह असलेल्या नातेवाइकांचे नंबरला पाठविले जातात. ‘दिल्ली पोलिसमधून बोलतो’, असे सांगून दमदाटी केली जाते. या सर्व प्रकाराला घाबरून अनेक नागरिक लोनपेक्षा अधिक पैसे भरतात. नागरिकांची आर्थिक फसवणूक तर होतेच; परंतु खूप मोठ्या प्रमाणात मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे लासलगाव पोलिस ठाणे, नाशिक ग्रामीण यांचाकडून आव्हान करण्यात येते, की नागरिकांनी अशा प्रकारे कोणत्याही अल्पावधीतील लोनच्या आमिषाला बळी पडू नये. नमूद अल्पावधीतील लोन अधिकृत नसून केवळ नागरिकांना फसवणुकीसाठी याचा वापर केला जात असल्याची माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांनी दिली.

हेही वाचा: धार्मिकनगरीतील ‘भोंगा’यण; ‘भोंगा लावण्याबद्दल मी काय बोलावे?’ : राज्यपाल

Web Title: App Offers That Give You Loan In Two Minutes Could Be Dangerous Nashik Cyber Crime News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top