Nashik News : मालेगावात ॲप्पल बोरची धूम! रोज पंधराशे कॅरेटची आवक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Afroz Sheikh selling apple borer near the fruit market.

Nashik News : मालेगावात ॲप्पल बोरची धूम! रोज पंधराशे कॅरेटची आवक

मालेगाव (जि. नाशिक) : येथील फळ बाजारात विविध फळांबरोबरच आकर्षक ॲप्पल बोर विक्रीसाठी आले आहेत. कसमादेत ॲप्पल बोरचे उत्पादन वाढले आहे. सफरचंद ६० ते ७० रुपये किलोने मिळत आहे. ॲप्पल बोरची आवक वाढली असली तरी पुरेसा भाव मिळत नाही. किरकोळ विक्रीत शंभर रुपयांत अडीच किलो बोर मिळत आहेत.

शहर व परिसरात ॲप्पल बोरची धूम आहे. येथे रोज पंधराशे कॅरेट ॲप्पल बोर विक्रीसाठी येत आहेत. महामार्गासह मुख्य रस्त्यांवर नायलॉनच्या लहान पिशवीत बोर विक्रीचा फंडा सर्वत्र दिसून येत आहे. (Apple bore boom in Malegaon Daily income of fifteen hundred carats Nashik News)

येथील फळ बाजारात सीताफळ, डाळिंब, पेरू, खरबूज, टरबूज, संत्री, अंजीर, पपई, द्राक्ष विक्रीसाठी येत आहेत. ॲप्पल बोर व पपईला चांगली मागणी आहे. घाऊक बाजारात ॲप्पल बोरचा कॅरेट सहाशे रुपयाला विकला जात आहे. येथे रोज पंधराशे कॅरेट ॲप्पल बोरची विक्री होत आहे. वर्षातून एकदा येणारे ॲप्पल बोर डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून विक्रीला येत आहेत. फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत ॲप्पल बोरची चव चाखता येईल.

मालेगाव तालुक्यातील वडनेर, दाभाडी, आघार, येसगाव, तसेच चाळीसगाव येथील मेहुणबारे येथून बोर विक्रीसाठी येत आहेत. सुरवातीला बोराला किरकोळ बाजारात शंभर रुपये किलोप्रमाणे भाव मिळत होता. आवक वाढल्याने भाव निम्म्याने घसरले आहेत. ॲप्पल बोर व सफरचंदाच्या भावात फारसा फरक नाही.या वर्षी परतीच्या पावसामुळे बोर पिकाचे नुकसान झाले. येथील फळ बाजारातून दिल्ली, आग्रा, लखनौ, इंदूर, सुरत, अहमदाबाद, धुळे, नाशिक आदी मोठ्या बाजारपेठांमध्ये ॲप्पल बोर विक्रीसाठी पाठविले जात आहेत.

हेही वाचा : Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

हेही वाचा: Dhule News : जयंत पाटलांचे निलंबन मागे घ्या;राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

बोरमध्ये चमेली, काट बोर, चमेली उम्रान, मोठा बोर यासह असंख्य जाती आहेत. यामध्ये ॲप्पल बोरला सर्वांत जास्त मागणी आहे. भाव आवाक्यात असल्याने मालेगावकर ॲप्पल बोरची चव चाखत आहेत. २०१९ मध्ये ॲप्पल बोरला नऊशे ते हजार रुपये कॅरेट भाव होता. सध्या तो निम्म्यावर आल्याचे आयएमबी फ्रूट कंपनीचे संचालक नजीब अहमद यांनी सांगितले.

"त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. काही शेतकरी ॲप्पल बोरचा माल दिल्ली, सुरत येथे पाठवित आहेत. नुकसान झालेल्या फळपिकांना शासनाने अद्यापही नुकसानभरपाई दिली नाही. शासनाने सर्वच फळपिकांना अनुदान द्यावे."-सुरेश निकम, ॲप्पल बोर उत्पादक, दाभाडी

हेही वाचा: Dhule News : धुळ्यात नाताळमुळे चर्चमध्ये तयारीला वेग

टॅग्स :MalegaonNashik