MBA-Executive : 'एमबीए-एक्‍झिक्‍युटिव्‍ह'साठी अर्जाची या तारखेपर्यंत मुदत

MBA Executive Admission News
MBA Executive Admission Newsesakal

MBA-Executive : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्‍या नाशिक उपकेंद्राच्‍या माध्यमातून एमबीए (एक्झिक्युटिव्ह) या शिक्षणक्रमाच्‍या प्रवेशासाठी परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेकरिता इच्‍छुक व पात्र उमेदवारांना नोंदणी करण्यासाठी १७ जूनपर्यंत मुदत उपलब्‍ध असणार आहे.

एमबीए ( एक्झिक्युटिव्ह) हा अद्वितीय आणि विचारपूर्वक तयार केलेला दोन वर्षाचा पूर्णवेळ अभ्यासक्रम आहे. (Application deadline for MBA Executive till 17th june nashik news)

या अभ्यासक्रमास विविध क्षेत्रातील नोकरदार, व्यावसायिक आणि उदयोजकांना प्रवेशाची संधी उपलब्‍ध असते. त्यांचे ज्ञान आणि कौशल्ये सतत वाढविण्याची संधी या माध्यमातून उपलब्‍ध केली जात असते.

हा अभ्यासक्रम व्यावसायिक तसेच नोकरदारांसाठी तयार केलेला असल्याने याचे अभ्यासवर्ग सायंकाळी साडे सहा ते रात्री साडे नऊदरम्‍यान व्यवस्थापनशास्त्र अभ्यासक्रमाच्या परिसरात घेतले जातात. या अभ्यासक्रमास विद्यार्थी विपणन, वित्त, ऑपरेशन्स किंवा मानव संसाधन व्यवस्थापन यांसारख्या विषयांची निवड करू शकतात.

या अभ्यासक्रमास प्रवेश मिळविण्यासाठी ऑनलाईन प्रवेश परीक्षा देणे आवश्यक आहे. शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी ही परीक्षा जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात घेण्याचे नियोजित आहे. तत्‍पूर्वी इच्‍छुक व पात्रताधारक उमेदवारांना परीक्षेसाठी नोंदणी करण्यासाठी १७ जूनपर्यंत मुदत असणार आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

MBA Executive Admission News
PSI Recruitment : साडेतीन वर्षानंतरही पीएसआयची नियुक्ती रखडली; सुमारे ६५० उमेदवार प्रतिक्षेत

पात्रतेचे निकष असे-

प्रवेशासाठी अर्ज करणारा उमेदवार हा युजीसी, एआयसीटीई, एआययू यांतून कोणत्याही विषयात पदवीधारक असणे आवश्‍यक आहे. पदवी अभ्यासकमात किमान ५० टक्के गुण आवश्यक असून, राखीव प्रवर्गाच्या उमेदवारांबाबत ४५ टक्के गुण आवश्‍यक असतील.

व्यावसायिक/व्यवस्थापकीय/ कार्यकारी स्तरावर किमान तीन वर्षांचा अनुभव आवश्यक आहे. पदवी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतरचा अनुभव ग्राह्य धरला जाणार आहे.

उपकेंद्रास संपर्क साधण्याचे आवाहन

पात्रतेच्या निकषांबद्दल एमबीए (एक्झिक्युटिव्ह) प्रवेशाविषयी सविस्‍तर सूचना https://campus.unipune.ac.in/ccep/login.aspx या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अभ्यासक्रमाविषयी अधिक माहितीसाठी सिडकोतील लेखानगर भागातील अचानक चौ येथील सावित्रीबाई फुले पुणे विसद्यापीठ उपकेंद्र येथे कार्यालयीन वेळेत भेट देता येईल, असेही कळविले आहे.

MBA Executive Admission News
Education Department : शिक्षण विभागाचा 'खेळखंडोबा'; रिक्त पदं भरण्याबाबत शासनाची डोळेझाक भूमिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com