Nashik : 9 निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्ती

NMC
NMCesakal

नाशिक : महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी (NMC election) पाच प्रभागांसाठी एक निवडणूक अधिकारी (Election Officer) नियुक्त करण्याच्या सूचना राज्य निवडणूक आयोगाने (State Election Commission) दिल्या असून, त्यानुसार शहरात नऊ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. (Appointment of 9 Election Officers NMC election Nashik News)

NMC
अन् आता कामे उरकण्याची लगबग; गंगाघाटावरील कामांची ‘स्मार्ट’ स्थिती

महापालिका निवडणुका अद्याप घोषित झाल्या नसल्या तरी राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार निवडणूक प्रक्रियेची तयारी करण्याच्या सूचना महापालिकेला दिल्या आहेत. प्रथम प्रभागरचना जाहीर करण्यात आली. त्यानंतर आरक्षण टाकण्यात आले व सध्या प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. निवडणुकीची तयारीचा भाग म्हणून राज्य निवडणूक आयोगाने आता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याची सूचना दिल्या आहेत. आयोगाच्या सूचनेनुसार चार ते पाच प्रभागांसाठी एक निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त केला जाईल. उपजिल्हाधिकारी व त्यापेक्षा अधिक वरच्या संवर्गातील निवडणूक निर्णय अधिकारी राहील. महापालिकेसाठी एकूण ४४ प्रभाग आहे. त्याचा विचार करता नऊ निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त केले जातील. त्याचबरोबर महापालिका मुख्यालयात आचारसंहिता कक्ष स्थापन केला जाणार आहे. खर्चाचा हिशोब ठेवण्यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन केला जाणार आहे.

NMC
JEE दुसऱ्या सत्राच्‍या नोंदणीची शनिवारपर्यंत मुदत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com