Former MP Sameer Bhujbal speaking at the meeting organized on Wednesday.
Former MP Sameer Bhujbal speaking at the meeting organized on Wednesday.esakal

NCP Mumbai President : राष्ट्रवादी’च्या मुंबई अध्यक्षपदी समीर भुजबळ; अजित पवारांच्या हस्ते नियुक्तिपत्र

NCP Mumbai President : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने मुंबई अध्यक्षपदी नाशिकचे माजी खासदार समीर भुजबळ यांची नियुक्ती केली आहे. या पदाची जबाबदारी ते सक्षमपणे पार पाडतील, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.

मुंबईतील गरवारे क्लब हाऊस येथे बुधवारी (ता. २६) राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक झाली. या वेळी राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते व मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांना नियुक्तिपत्र देण्यात आले. (Appointment of Sameer Bhujbal as Mumbai President of NCP nashik news)

या वेळी महिला प्रदेशाध्यक्षा तथा महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपालीताई चाकणकर, सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, माजी आमदार पंकज भुजबळ, युवक अध्यक्ष सूरज चव्हाण, प्रमोद हिंदुराव, शिवाजीराव नलावडे, मुंबई कार्याध्यक्ष नरेंद्र राणे, सुनीता शिंदे, सिद्धार्थ कांबळे, ॲड. रवींद्र पगार, मुकेश गांधी, अर्शद सिद्दिकी, महेंद्र पानसरे, संजय तटकरे, संतोष धुवाळी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले, की मुंबई अध्यक्षपदी समीर भुजबळ यांची निवड झाली, ही अतिशय आनंदाची बाब आहे. समीर भुजबळ यांनी खासदार म्हणून अतिशय उत्तमरीत्या आपली जबाबदारी पार पाडली. विकासाची अनेक कामे त्यांनी नाशिकमध्ये केली. त्यांना मुंबई शहरातील बारकावे माहिती आहेत.

गेल्या २५ वर्षांत अनेक प्रसंगांमध्ये एक व्हिजन घेऊन काम करून यशस्वी जबाबदारी त्यांनी पार पाडली. त्यांच्या रूपाने पक्षाकडे एक व्हिजन असलेलं, अनुभवी युवा नेतृत्व आपल्याला मिळालं आहे. मुंबई शहरात अधिक लक्ष देऊन क्रांती घडविण्याचे काम त्यांच्याकडून होईल. त्यांच्याकडून मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Former MP Sameer Bhujbal speaking at the meeting organized on Wednesday.
Sameer Bhujbal : बाजार समितीचा निकाल परिवर्तनाची नांदी ठरेल : समीर भुजबळ

कार्याध्यक्ष खासदार पटेल म्हणाले, की राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेत मंत्री छगन भुजबळ व समीर भुजबळ यांचं योगदान अतिशय महत्त्वाचे आहे. मुंबई शहराला समीर भुजबळ यांच्यासारख्या कुशल नेतृत्वाची गरज होती. मुंबईत पक्षाचे जाळ वाढण्यासाठी समीर भुजबळ हे यशस्वीपणे काम करतील.

मंत्री भुजबळ म्हणाले, की मुंबई शहरात सचिन अहिर आणि त्यानंतर नवाब मलिक यांनी अतिशय चांगले काम केले. राष्ट्रवादी पक्षस्थापनेच्या कार्यकाळात समीर भुजबळ यांनी पक्षाचे चिन्ह, ध्वज नोंदणी, बैठका, सभा यासह महत्त्वाची कामे पार पाडली.

पक्षाने समीर भुजबळ यांना मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे. ते पक्षवाढीसाठी यशस्वीपणे जबाबदारी पार पाडतील. त्यांना आपल्याला सर्वांना अधिक बळ द्यावं लागेल, असे त्यांनी सांगितले. मुंबई शहरात समीर भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसला अधिक उभारी देतील, असे त्यांनी सांगितले.

Former MP Sameer Bhujbal speaking at the meeting organized on Wednesday.
Ajit Pawar: 'अजित पवारांना लवकर मुख्यमंत्री होऊ दे'; 'लालबागच्या राजा'ला साकडं

प्रदेशाध्यक्ष तटकरे म्हणाले, की नाशिक लोकसभा मतदारसंघातून प्रतिनिधित्व करीत असताना समीर भुजबळ यांनी अनेक महत्त्वाची विकासाची कामे केली. त्यांच्या नेतृत्वाखाली मुंबई प्रांतातील कार्यकारिणी निर्माण करण्यात येऊन त्यांच्या संघटन कौशल्याचा पक्षाच्या वाढीस अधिक फायदा होईल, असे त्यांनी या वेळी सांगितले.

मुंबईत पक्ष बळकट करणार

‘राष्ट्रवादी’च्या स्थापनेपासून आपण पक्षात कार्यरत आहोत. अनेक महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडली आहे. पक्षाने खासदारकीची संधी दिली. नाशिकच्या सर्वसामान्य जनतेची सेवेची संधी मिळाल्यावर नाशिकच्या विकासासाठी आपण प्रयत्न केले. मुंबई हे राज्यातील महत्त्वाचं शहर आहे.

या शहरातच माझी जडणघडण झाली. त्यामुळे या शहराच्या प्रमुखपदाची जबाबदारी मिळाली आहे. आपण ती जबाबदारी यशस्वीपणे पार पाडून मुंबईत पक्ष अधिक बळकट करणार असल्याचे समीर भुजबळ यांनी सांगितले.

Former MP Sameer Bhujbal speaking at the meeting organized on Wednesday.
Ajit Pawar : ''...त्यासाठी १४५ आमदार लागतात'' अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदावरुन मोहित कंबोज यांनी डिवचलं

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com