Nashik News : दिंडोरी, पेठ तालुक्यांतील रस्त्यांच्या कामांना मंजूरी

Narhari Zirwal
Narhari Zirwalesakal

Nashik News : विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रस्तावित केलेल्या विविध कामांना मंजुरी मिळाली आहे. यामध्ये दिंडोरी व पेठ तालुक्यातील रस्त्यांसाठी सुमारे १४० कोटींच्या कामांचा समावेश असून, विविध योजनांच्या माध्यमातून मतदार संघात जवळपास ३०० कोटींची कामे होणार आहेत. (Approval for road works in Dindori Peth taluka by narhari zirwal Nashik News)

मागील सरकारच्या काळातील विकासकामांची स्थगिती उठविणे, झालेल्या कामांना निधी वितरित व्हावा व नव्याने आवश्यक विकासकामे व्हावीत यासाठी आमदार झिरवाळ यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात विशेष प्रयत्न केले.

तालुक्यातील मुख्य रस्ते, ग्रामीण मार्गांची दुरवस्था दूर करण्यासाठी रस्ते नूतनीकरण, पुल, मोऱ्या आदी कामे प्रस्तावित केली. अर्थसंकल्पासोबतच जिल्हा वार्षिक नियोजन, आदिवासी क्षेत्र विकास योजना, बिगर आदिवासी क्षेत्र विकास, राष्ट्रीय रोजगार हमी, डोंगरी विकास, आमदार निधी आदी योजनांद्वारे त्यांनी विविध विकासकामे मंजूर केली आहेत.

आरोग्य विभागांतर्गत करंजवन व पांडाने आरोग्य केंद्रांच्या नवीन इमारतींसाठी निधी, दिंडोरी तहसील कार्यालयासाठी सिड फॉर्मची जागा व निधी, पेठ व दिंडोरी येथे नवीन बसस्थानकांची कामे, देवसाने व भुवन येथील आश्रम शाळेच्या नवीन इमारतींसाठी २२ कोटींच्या कामास मंजुरी, गेल्या अर्थसंकल्पात राहून गेलेले दिंडोरी,

पालखेड, पिंपळगाव या प्रमुख रस्त्याचे राज्य मार्गात रूपांतर करत त्यासाठी सहा कोटींच्या कामासह मतदारसंघातील विविध राज्य मार्ग, जिल्हा मार्गांसाठीही सुमारे ८८ कोटी, तर ग्रामीण मर्गांसाठी ६२ कोटींची कामे मंजूर झाली.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

Narhari Zirwal
CM Shinde on Crop Damage : शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी; मदतीबाबत मंत्रीमंडळात लवकरच निर्णय : मुख्यमंत्री शिंदे

पेठ तालुक्यातील अमलोन रस्ता आणि जिल्हा परिषद मराठी शाळा दुरुस्ती व नवीन इमारतीसाठी प्रत्येकी तीन कोटींचा निधी मंजूर झाला आहे. मतदार संघातील सिंचन प्रकल्प, बंधारे यासाठी मंजुरी घेण्यात आली आहे.

जांब येथे राज्यातील पहिली आदिवासी औद्योगिक वसाहत उभारण्यास मंजुरी मिळाली आहे. अक्राळे, जांबुटके औद्योगिक वसाहतींसाठी पायाभूत सुविधांच्या कामांना मंजुरी मिळाली असून, येथे विविध प्रकल्प येत आहेत. कृषी, वन, आरोग्य, शिक्षण आदी विभागांतर्गत काही कामे मंजूर झाली आहेत.

दिंडोरीत पोलीस कार्यालय व वसाहत, तालुका निबंधक कार्यालय, तहसील कार्यालय नवीन इमारत, नवीन बसस्थानक होणार आहे. तसेच दिंडोरी येथे मुख्य अग्निशमन सेवाही सुरू करण्यात येणार आहे.

नागरिकांनी, तसेच नगरसेवक, जि. प. व पं. स. सदस्य, सरपंच, ग्राम पंचायत सदस्य यांनी वर्षभर मागणी केलेल्या विविध विकासकामांच्या पूर्ततेसाठी आमदार झिरवाळ हे सातत्याने पाठपुरावा करत असून, यंदाच्या अर्थसंकल्पात मंजूर झालेली विविध कामे लवकरात लवकर झाल्यास तालुक्याच्या विकासाचा बॅकलॉग भरून निघणार आहे.

Narhari Zirwal
Summer Season : गरिबांच्या फ्रीजची मागणी वाढली! नवनवीन आकाराच्या माठांची चलती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com