esakal | जिल्ह्यात २० नवे कोरोना केअर सेंटर आणि ६ लसीकरण केंद्रांना मान्यता
sakal

बोलून बातमी शोधा

covid vaccination

जिल्ह्यात 20 नवे कोरोना केअर सेंटर आणि 6 लसीकरण केंद्रांना मान्यता

sakal_logo
By
कुणाल संत

नाशिक : जिल्ह्यात सद्यःस्थितीत सुरू असलेल्या पाच लसीकरण केंद्रांव्यतिरिक्त(vaccination centre) आदिवासी व ग्रामीण भागात आणखी सहा लसीकरण केंद्रे सुरू करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी स्थायी समितीत दिली. (Approval of 20 new Corona Care Centers and 6 Vaccination Centers in the district)

सहा लसीकरण केंद्रे : बनसोड

ग्रामीण भागातील लोकसंख्येचा विचार करत ग्रामीण भागात लसीकरण केंद्रांची संख्या वाढविण्यात यावी या उद्देशाने प्रत्येक तालुक्यात एक लसीकरण केंद्र सुरू करण्याची विनंती गावित यांनी केली. त्यावर श्रीमती बनसोड म्हणाल्या, की कोरोना(corona) प्रतिबंधक लसीकरण करण्यासाठी राज्य शासनाच्या नियमानुसार पाच केंद्रे मंजूर करण्यात आलेली आहेत. यात ग्रामीण भागात मोहाडी, पिंपळगाव बसवंत या ठिकाणी सध्या केंद्रे सुरू असून, नाशिक महापालिका क्षेत्रात दोन व मालेगाव महापालिका क्षेत्रात एक आहे. यामुळे जिल्ह्यातील लोकसंख्येचा विचार करत शासनाकडे विनंती केल्यानंतर आणखी सहा लसीकरण केंद्रे सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यादृष्टीने नियोजन सुरू असून, यातील तीन केंद्रे आदिवासी, तर तीन बिगरआदिवासी क्षेत्रात सुरू केली जाणार आहेत. याशिवाय मे महिन्याच्या अखेरीस मुबलक प्रमाणात लस मिळण्याची शक्यतादेखील श्रीमती बनसोड यांनी या वेळी वर्तविली.

हेही वाचा: नाशिक जिल्ह्यातील डोंगराळ भागात भुकंपाचे धक्के; नागरिकांत भीती

रखडलेल्या पीएचसीची कामे पूर्ण केली जाणार

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने राज्यासह जिल्ह्यातही मोठे नुकसान होत आहे. यातच आता केंद्र सरकारने तिसऱ्या लाटेची शक्यतादेखील वर्तविली आहे. त्यादृष्टीने ग्रामीण भागात आरोग्यव्यवस्था कमी पडू नये म्हणून जिल्ह्यातील पाटोदा, खेडगाव यासह ज्या प्राथमिक आरोग्य केंद्रांची कामे किरकोळ कारणामुळे रखडली आहेत अशा केंद्रांचा आढावा घेत पुढील काही दिवसांत तीदेखील पूर्ण केली जातील, असे श्रीमती बनसोड यांनी सांगितले.

हेही वाचा: VIDEO : द्राक्ष नगरीत ‘रु-द्राक्ष’ची कृपा! आरोग्यासाठी चमत्कारिक फायदे

नवीन २० कोविड केअर सेंटरला मान्यता : डॉ. आहेर

जिल्ह्यात सद्यःस्थितीत २९ कोविड केअर सेंटर(covid care centre) सुरू असून, या ठिकाणी आठशे रुग्ण उपचार घेत आहेत. मात्र लोकसंख्येचा विचार करता जिल्ह परिषद आरोग्य विभागातर्फे आणखी २० कोविड केअर सेंटर सुरू करण्यास मान्यात मिळाल्याचे जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. कपिल आहेर यांनी सांगितले. या ठिकाणी रुग्णांना कसल्याही प्रकारची कमतरता भासू नये म्हणून काही सेंटरमध्ये ऑक्सिजन पाइपलाइन केली जात आहे. ३०० जम्बो सिलिंडरदेखील(jumbo cylider) पुढील आठ ते दहा दिवसांत मिळतील असे नियोजन केले जात आहे. तसेच लवकरच आवश्‍यक मनुष्यबळ उपलब्ध करत ही सेंटर कार्यान्वित होतील.