नाशिक जिल्ह्यातील डोंगराळ भागात भुकंपाचे धक्के; नागरिकांत भीती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

earthquake

नाशिक जिल्ह्यातील डोंगराळ भागात भुकंपाचे धक्के; नागरिकांत भीती

उमराळे (जि.नाशिक) : आज पहाटे ५ वाजून ९ मिनिटांनी २.३ रिस्टल स्कैल अशा सौम्य धक्क्याची नोंद करण्यात आली असून भूकंपाचा (earthquake) केंद्रबिंदू नाशिकपासून ९६ किलो मिटरवर असल्याची माहिती मिळत आहे.earthquake in district nashik marathi news)

डोंगराळ आदिवासी पट्ट्यात भूकंपाचे सौम्य धक्के

दिंडोरी-पेठ-सुरगाणा (dindori-peth-surgana) तालुक्याच्या सीमावर्ती भागात असलेल्या डोंगराळ आदिवासी पट्ट्यात (tribal areas) भूकंपाचे सौम्य धक्के दिनांक 8 मे रोजी पहाटे 05 वाजून 09 मिनिटांनी जाणवले. या परिसरात मागील दोन ते तीन वर्षांपासून सातत्याने एप्रिल-मे महिन्याच्या दरम्यान भूकंपाचे (earthquake) सौम्य धक्के जाणवत आहेत. त्यामुळे या परिसरात नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे.(

हेही वाचा: मरणानंतर सरणही महाग! अंत्यविधीसाठी लुट करणाऱ्यांवर कारवाईची मागणी

घरांच्या भिंती हादरल्या

या धक्क्यामुळे कुठलीही मनुष्य व वित्तहानी झालेली नसून पहाटे भूकंपाचा आवाज होऊन परिसरातील गांडोळे, देहेरे कुईआंबी, उपिळपाडा, सावरपातळी, चीकाडी, शृंगारपाडा या गावातील घरांचे पत्रे हलू लागले, घरांच्या भिंती हादरत असल्याचे जाणवले. जमीनही हादरल्याचे या परिसरातील नागरिकांनी 'सकाळ'ची बोलताना सांगितले. सदर परिसर आदिवासी वाडी वस्तीचा असुन डोंगराळ व घाटाचा आहे. मागील वर्षी याच दरम्यान भूकंपाचे धक्के जाणवल्याने गावांमध्ये असणारे बसण्याचे बाकडे तुटुन पडले होते. तसेच गोठ्यातील जनावरे ही धावू लागली होती.

हेही वाचा: लस घेण्यासाठी नाशिकमध्ये पहाटे पाचपासून रांगा

योग्य ती कार्यवाही व्हावी

याबाबत नागरिकांनी प्रशासनास माहिती कळवली होती परंतु यावर कुठलीही कार्यवाही झाल्याचे आढळून आलेले नाही. तरी भविष्यात पुन्हा भूकंपाच्या धक्क्यातून या भागात मनुष्य, वित्त हानी होऊ नये,यासाठी प्रशासनाने योग्य ती कार्यवाही करावी. नागरिकांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी प्रयत्न करावेत, तसेच या परिसरात भूकंपमापन यंत्र बसवून योग्य ती कार्यवाही व्हावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

टॅग्स :Earthquake