Arjun Sonawane
sakal
नाशिक: राष्ट्रीय पदकविजेता उदयोन्मुख खेळाडू अर्जुन श्रीकांत सोनवणे (वय २०) याचे अपघाती निधन झाले. पंजाबमध्ये आयोजित अखिल भारतीय आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संघातून अर्जुन सहभागी झाला होता. स्पर्धेतून रेल्वेने परतत असताना कोटा रेल्वेस्थानकानजीक तो शनिवारी (ता. १) रात्री तोल जाऊन पडला. राष्ट्रीय खेळाडू गमावल्याने हळहळ व्यक्त होत आहे.