Railway Gateman Recruitment : माजी सैनिकांना मध्य रेल्वेत 292 जागांवर सेवेची संधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Recruitment

Railway Gateman Recruitment : माजी सैनिकांना मध्य रेल्वेत 292 जागांवर सेवेची संधी

नाशिक : पुण्याच्या आर्मी वेल्फेअर प्लेसमेंट ऑर्गनायझेशनतर्फे २ फेब्रुवारीला सकाळी नऊ ते दुपारी चारला नाशिक रोडच्या आर्टिलरी सेंटरमध्ये माजी सैनिकांसाठी मध्य रेल्वेत रेल्वे गेटमनच्या २९२ जागांसाठी भरती प्रक्रिया होणार आहे. (army Ex serviceman opportunity to serve on 292 posts in Central Railway railway gateman nashik news) '

हेही वाचा : प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?

हेही वाचा: Maghi Ganesh Jayanti : माघी गणेश जयंतीला गौरीव्रताचे महत्त्व; गणेश यागासह महाप्रसादाचे आज कार्यक्रम

भरतीनंतर महिन्याला ३३ हजार रुपये वेतन, साप्ताहिक एक सुटी मिळेल. त्यासाठी ५४ वर्षे वयाच्या आतील आणि किमान शिक्षण दहावी उत्तीर्ण असलेल्यांना संधी मिळेल. वैद्यकीयदृष्ट्या सक्षम असणे आवश्‍यक असेल.

भरतीसाठी येताना पेन्शन बुक, पीपीओ, ओळखपत्र, आधारकार्ड, पॅनकार्ड, बँक पासबुक, कॅन्सल धनादेश, पासपोर्ट आकाराची १० छायाचित्रे सोबत आणावयाची आहेत. माहितीसाठी ०२०-२६३३४४२०, २६३३४४१९, भ्रमण-दूरध्वनी क्रमांक ९८३४७१५२९५, ९८३४९७१७९९ यावर संपर्क साधता येईल.

हेही वाचा: Nashik News | मार्चअखेर स्मशानभूमीतील कामे पूर्ण करा : NMC आयुक्तांच्या सूचना