Maghi Ganesh Jayanti : माघी गणेश जयंतीला गौरीव्रताचे महत्त्व; गणेश यागासह महाप्रसादाचे आज कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

On the occasion of Maghi Ganesha Jayanti, the silver Ganapati temple has a grand arrangement of fruits.

Maghi Ganesh Jayanti : माघी गणेश जयंतीला गौरीव्रताचे महत्त्व; गणेश यागासह महाप्रसादाचे आज कार्यक्रम

नाशिक : माघी गणेश चतुर्थीला ‘विनायकी चतुर्थी’ म्हटले जाते. असूर नरांतकाचा वध करण्यासाठी कश्यपाच्या पोटी विनायक नावाने अवतार धारण केला म्हणून ही विनायकी प्रसिद्ध आहे. शिवाय या चतुर्थीला ‘ढुंढिराज चतुर्थी’ असेही म्हणतात.

या दिवशी उपवास करून श्रद्धेने गणेशाची पूजा केली जाते. पंचमीला तिळाचे भोजन केले जाते. गौरी व्रताचे महत्त्व असलेल्या माघी गणेश जयंतीनिमित्त गणेश मंदिरातून बुधवारी (ता. २५) गणेश याग, महाप्रसाद असे कार्यक्रम होतील.

हेही वाचा: Guru Shukra Yuti : 'या' तीन राशींच्या नशीबात राजयोग, होईल पैशांचा वर्षाव; पण कधी? ते जाणून घ्या

गणपती मंदिरात पहाटेपासून भाविकांची दर्शन, पूजा- विधीसाठी वर्दळ सुरू होईल. माघी गणेश जयंतीच्या आख्यायिकेनुसार तिथीला स्नान, दान, जप व होम आदी शुभ कर्मांनी गजाननाच्या कृपेने सहस्रपट कामे यशस्वी होतात.

या दिवशी नक्‍तव्रत करून जे धुंडिराजाची मध्यान्ही व सायंकाळी पूजा करतील, त्यांना सर्व देवांच्या पूजेचे फल मिळते व ते सर्वत्र विजय प्राप्त होतो, अशी आख्यायिका आहे.

हेही वाचा : प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?

हेही वाचा: Ganesh Jayanti : गणपतीची पुजा करताना राशीनुसार करा 'या' मंत्रांचा जप; लक्ष्मीची होणार कृपा

सौभाग्य अन आरोग्याची प्राप्ती

ॐ महोल्काय विद्‌महे

वक्रतुंडाय धीमहि ।

तन्नोदन्ति प्रचोदयात् ॥

अग्निपुराणातील हा श्‍लोक आहे. तिथीस गौरीव्रत केले जाते. गणांसह गौरीची पूजा करतात. भगवती गौरीची पूजा होते. सुख-सौभाग्यासाठी सुवासिनींची पूजा केली जाते. प्रसन्न मनाने स्वबांधवांसह स्वत: भोजन केले जाते. गौरीव्रताच्या प्रभावाने सौभाग्य व आरोग्य यांची प्राप्ती होते.

हेही वाचा: Ukadiche Modak Recipe: माघी गणेश जयंती स्पेशल बनवा उकडीचे परफेक्ट मोदक