Shivsena Thackeray Group: ‘उबाठा’ गटाच्या संयमाची परीक्षा

एकाचे दोन घरे झाल्याने दोन्ही घरांचे सदस्य सांभाळण्यासाठी धडपड सुरू आहे. फुटलेले घर जुन्या घरातील सदस्यांना ओढत आहे, तर जुने घर टिकवून ठेवण्यासाठी धडपड सुरू आहे.
Vijay Karanjkar, Sudhakar Badgujar, Vasant Gite, Sunil Bagul, Vinayak Pandey, Vilas Shinde
Vijay Karanjkar, Sudhakar Badgujar, Vasant Gite, Sunil Bagul, Vinayak Pandey, Vilas Shinde esakal

बाळासाहेब ठाकरे हयात असताना शिवसैनिक आणि संयम हे सूत्र तसे फारसे जुळत नसायचे; परंतु गेल्या दोन-अडीच वर्षांतील राजकीय घडामोडी लक्षात घेता शिवसेनेला (उबाठा) संयमाचीच परीक्षा पाहण्याची वेळ आली. त्याला कारण म्हणजे बाळासाहेबांचा काळ वेगळा होता. उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्या काळातील शिवसेनेचा फॉर्म वेगळा आहे. दोन-अडीच वर्षांतील काळ शिवसेनेसाठी अवघड झाला.

एकाचे दोन घरे झाल्याने दोन्ही घरांचे सदस्य सांभाळण्यासाठी धडपड सुरू आहे. फुटलेले घर जुन्या घरातील सदस्यांना ओढत आहे, तर जुने घर टिकवून ठेवण्यासाठी धडपड सुरू आहे. ओढताणीच्या या खेळात शिवसेनेसाठी वर्षाचा शेवट जरा अवघडच गेला. तो म्हणजे एमडी प्रकरणानंतर शिवसेना नेत्यांचे व्हायरल झालेले फोटो व मुंबई बाँबस्फोटातील आरोपी सलीम कुत्तासोबत महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांचे फोटो व व्हिडिओ विधानसभेत दाखविल्यानंतर त्यांची लागलेली चौकशी. - विक्रांत मते

(article about Shiv Sena Thackeray Group nashik recap 2023 )

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा एक गट फुटल्यानंतर दोन गटांमधील द्वंद टीव्ही कॅमेऱ्यासमोर, तर कधी रस्त्यावर दिसून येते. परंतु हे द्वंद कुठे स्थिर होत असतानाच नाशिकमध्ये मात्र टोक गाठले आहे. कधी काळी एकमेकांच्या जिवाला जीव देणारे, संकटसमयी मदतीला धावून येणारेच तेच आता एकमेकांसाठी संकट बनले आहे.

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची स्थापना झाल्यानंतर सुरवातीला फार मोठा गट त्यांच्या शिवसेनेत सहभागी होईल, असे वाटत नव्हते. परंतु दोन आमदार, नाशिक शहरातील जवळपास वीस माजी नगरसेवक शिंदे गटात गेल्यानंतर मोठा धक्का बसला. या परिस्थितीतही शिवसेनेचा टेम्पो टिकवून ठेवण्यात स्थानिक नेतृत्व यशस्वी ठरले.

मंत्री दादा भुसे यांच्या विरोधात गिरणा कारखान्याशी संबंधित आरोप केल्यानंतर मालेगावमध्ये उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभा घेऊन आव्हान दिले. भुसे यांचे कट्टर विरोधात हिरेंना उपनेते करून दुसरा धक्का दिला. दुसरीकडे भाजपविरोधात कायम तोफ डागणारे प्रवक्ते संजय राऊत यांनी महिना-दीड महिन्यानंतर नाशिकमध्ये भेट देऊन भाजपसह शिंदे सेनेला आव्हान दिले. या घडामोडीत ‘उबाठा’ शिवसेना जिवंत ठेवण्याचे काम झाले.

त्यामुळे ज्या वेगाने शिवसेना संपविण्याचा विश्‍वास होता तो विश्‍वास भाजपसह शिवसेनेच्या शिंदे गटाचा कमी झाला. परिणामी, लढाई हमरी-तुमरीवर आली. तशी त्याला ‘उबाठा’ शिवसेना देखील कारणीभूत ठरली.

Vijay Karanjkar, Sudhakar Badgujar, Vasant Gite, Sunil Bagul, Vinayak Pandey, Vilas Shinde
Salim Kutta Dance Case : पोलिसांना प्रतिक्षा लेखी उत्तरांची; ‘लाचलुचपत’कडून टांगती तलवार

एमडी प्रकरणात पालकमंत्री दादा भुसे यांना टार्गेट केल्यानंतर संघर्ष अधिक वाढला. एमडी ड्रग्ज प्रकरणातील प्रमुख संशयित आरोपी ललित पाटील (पानपाटील) याचे पूर्वीचे शिवसेना प्रवेशातील नेत्यांसोबतचे फोटो वॉर सुरू झाले.

‘उबाठा’ गटावरील आरोपानंतर आरोप झटकताना त्यांनी देखील काही फोटो मीडियाला दाखवत ‘जशास तसे’ उत्तर दिले. वर्ष संपत असताना वर्षाचा शेवट ‘उबाठा’ शिवसेनेसाठी डोकेदुखी ठरला. ‘उबाठा’चे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांचे मुंबई बाँबस्फोटातील आरोपी सलीम शेख उर्फ सलीम कुत्ता याच्या सोबतच फोटो व व्हिडिओ आमदार नीतेश राणे यांनी विधानसभेत दाखविले. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ एसआयटी चौकशी लावली.

एसआयटी चौकशी लागत नाही तोच दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी बडगुजर यांच्यावर लाचलुचपत विभागाने गुन्हा दाखल केला. त्यामुळे वर्षभर भाजप व शिंदे गटाच्या शिवसेनेच्या विरोधाला संयमाने तोंड देताना वर्षाअखेरीस महानगरप्रमुख चौकशीच्या फेऱ्यात अडकल्याने संपूर्ण शिवसेना व शिवसेनेसाठी धावून जाणारी यंत्रणाच ठप्प झाली.

एमडी ड्रग्ज व शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेले दोन भव्य मोर्चे व संजय राऊत व फायर ब्रॅन्ड नेत्या सुषमा अंधारे यांच्या जाहीर सभेने निवडणुकीचे वातावरण तयार केले. संघटनेत रिक्त झालेल्या जागांवर नवीन कार्यकर्त्यांना दिलेली संधी पक्षात ऊर्जा निर्माण करणारी ठरली.

Vijay Karanjkar, Sudhakar Badgujar, Vasant Gite, Sunil Bagul, Vinayak Pandey, Vilas Shinde
Sharad Pawar, Uddhav Thackeray यांची Vidhanparishad, Rajyasabha निवडणुकीत गोची, संख्याबळ राखण्याचं आव्हान

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com