अखेर त्या..वृद्धाचा मृतदेह सापडला

अखेर त्या..वृद्धाचा मृतदेह सापडला
Published on: 
NSK26H31563 : अरुण कोळी ------------ ‘वाघूर’च्या पात्रात सापडला ज्येष्ठाचा मृतदेह बैलांना पाणी पाजताना कडगावच्या अरुण कोळींचा पाय घसरून बुडून मृत्यू सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ६ : वाघूर पात्रात बैलांना पाणी पाजण्यासाठी गेलेले अरुण माधव कोळी सोमवारी (ता. ५) पाण्याचा अंदाज न आल्याने पाय घसरून नदीत बुडाले. अखेर शर्थीच्या शोध मोहिमेनंतर त्यांचा मृतदेह मंगळवारी (ता. ६) सकाळी साडेअकराला आढळून आला. कडगाव (ता. जळगाव) येथील अरुण कोळी (वय ६०) सोमवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास कडगाव शिवारात वाघूर नदीपात्रात गुरांना पाणी पाजण्यासाठी गेले होते. त्यांना पाण्याचा अंदाज न झाल्याने ते पाण्यात बुडाले. याबाबत आपत्ती व्यवस्थापन विभाग, महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या पथकाने त्यांचा शोध घेतला. सोमवारी रात्रीपर्यंत वृद्धाचा शोध लागला नव्हता. मंगळवारी सकाळी पुन्हा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नरवीरसिंह रावळ, अग्निशमन केंद्र अधिकारी भारत बारी यांच्या मार्गदर्शनाखाली शोध व बचाव कार्य सुरू करण्यात आले. नदीच्या पाण्याखाली झाडांमध्ये अरुण कोळी अडकलेले आढळून आले. अग्निशमन दलाने त्यांना नदीपात्रातून बाहेर काढले. त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी मृत घोषित केले. या शोध व बचाव कार्यात प्रकाश चव्हाण, देवीदास सुरवाडे, प्रदीप धनगर, सौरभ चिकटे, योगेश पाटील, किरण महाजन, महेंद्र कोळी, विकास सोनवणे यांनी सहभाग घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com