नाशिक: अकरावीत असताना वडिलांचे अकाली निधन झाले. त्यानंतर कुटुंबाची जबाबदारी सांभाळत शिक्षणही घेतले. गणित विषयात पदवी आणि पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेतले आणि शिक्षक म्हणून शासकीय आश्रमशाळेत दाखल झालो. नोकरीच्या भरवशावर मध्य प्रदेशातील मुलीसोबत लग्नाची रेशीमगाठ जमली. मेमध्ये साखरपुडा झाला.