Nashik News : आशा, गटप्रवर्तकांचा कोरोना प्रोत्साहन भत्ता रद्द | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aasha Worker News

Nashik News : आशा, गटप्रवर्तकांचा कोरोना प्रोत्साहन भत्ता रद्द

नाशिक : जिल्ह्यात कोरोना संकटात अहोरात्र काम करणाऱ्या अंगणवाडी आशा, गटप्रवर्तक यांना ग्रामपंचायतींकडून प्रोत्साहनपर भत्ता देण्याचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांचे आदेश विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी रद्द केले आहे.

एकाच कामकाजासाठी केंद्र व राज्य सरकारकडून व ग्रामपंचायत स्तरावरून मोबदला देणे उचित नसल्याचे सांगत हा मोबदला देणे शक्य नसल्याचे प्रशासनाने गटविकास अधिकारी यांना पत्राद्वारे कळविले. (Asha group promoters Corona incentive allowance cancelled Strong impact in district In Posture of organizations agitation Nashik News)

दरम्यान, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या या निर्णयाचे जिल्ह्यात शुक्रवारी (ता. २७) तीव्र पडसाद उमटले. कोरोनायोद्धा- आशा व गटप्रवर्तकांना ग्रामपंचायत स्तरावर प्रोत्साहनपर भत्ता बंद करण्याचे आदेश काढल्याबद्दल संताप व्यक्त करत जिल्हा परिषदेवर धडक मारली.

आयटक संलग्न महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा व गटप्रवर्तक संघटनेतर्फे त्वरित प्रोत्साहन भत्ता रद्द करण्याचा निर्णय रद्द करावा व आशा व गट प्रवर्तकांना थकीत प्रोत्साहन भत्ता देऊन कोरोनायोद्ध्यांचा सन्मान ग्रामपंचायत पातळीवर करावा, अशी मागणी करण्यात आली.

....इथं बनतो आपला लाडका तिरंगा

या वेळी कर्मचारी शिष्टमंडळाने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हर्षल नेहते, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांची भेट घेऊन ही मागणी केली. प्रोत्साहनपर भत्ता रद्द करत कर्मचाऱ्यांवर अन्याय केल्याचे संघटनेचे अध्यक्ष राजू देसले यांनी सांगितले.

या वेळी सुवर्णा मेतकर, माया घोलप, सुनीता गांगुर्डे, वैशाली माळी, गीतांजली गांगुर्डे, सविता जाधव, सुषमा वाटरे, मीरा बागूल, जिजा भोयर, ताई गांगोडे, पुष्पा जाधव, सुनीता गांगुर्डे, वैशाली दशपुते, हिरा गायकवाड, सुनीता खुरकुठे आदी उपस्थित होते.