Ashadhi Ekadashi 2023 : पंढरपूरसाठी येवल्यातून 24 बसची सुविधा

Ashadhi Wari 2023 Bus Arrangement
Ashadhi Wari 2023 Bus Arrangementesakal

Ashadhi Ekadashi 2023 : तालुक्यातील भाविकांना आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे जाण्या-येण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या येथील आगाराच्या वतीने येवला-पंढरपूरसाठी २४ बस पाठवल्या जाणार आहेत अशी माहिती आगारप्रमुख प्रवीण हिरे यांनी दिली. (Ashadhi Ekadashi 2023 Facility of 24 buses from Yevla to Pandharpur nashik news)

येथून २४ बसेसच्या माध्यमातून ४८ फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. याशिवाय ग्रामीण भागातून इच्छुक प्रवाशांची संख्या जास्त असल्यास मागणीनुसार त्यात्या गावातून एसटीची सेवा उपलब्ध करून दिली जाणार असून जास्तीत जास्त भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहनही श्री. हिरे यांनी केले आहे.

आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर येथे दर्शनार्थ जाणाऱ्या भाविकांसाठी २० जून ते ०१ जुलै या कालावधीत येवला ते पंढरपूर २४ फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Ashadhi Wari 2023 Bus Arrangement
Ashadhi Ekadashi Bakri Eid : बकरी ईदला कुर्बानी न देण्याचा निर्णय; पारोळा येथील मुस्लिम बांधवांचे कौतुक

२४ जूनला २ बस, २५ जून ३ बस, २६ जूनला ४ बस, २८ जूनला ४ बस, २९ जूनला ४ बस, ३० जूनला १ बस व १ जुलैला १ बस यानुसार येवला आगारातून ४८ फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले असून याच कालावधीत वारकऱ्यांना आपापल्या घरी परतण्यासाठी पंढरपूर ते येवला बससेवाही उपलब्ध असणार आहे.

सुरक्षित प्रवास व वेळेवर पोचण्यासाठी एसटीने प्रवास करावा असे आवाहन येवला आगाराने केले आहे.

Ashadhi Wari 2023 Bus Arrangement
Ashadhi Ekadashi Bakri Eid : आषाढी एकादशीमुळे बकरी ईदच्या दिवशी कुर्बानी नाही; जपला धार्मिक आदरभाव!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com