
हिंदू- मुस्लीम ऐक्याचे दर्शन; आषाढी असल्याने ईदला ‘कुर्बानी’ नाही
कळवण (जि. नाशिक) : कळवण येथे हिंदू- मुस्लीम (Hindu-Muslim) बांधवांनी ऐक्याचे दर्शन घडवत यंदा बकरी ईद व आषाढी यात्रा एकत्रित साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. आषाढी एकादशीच्या दिवशीच बकरी ईद असल्याने रविवारी मांस विक्रीची दुकाने बंद ठेवून व ‘कुर्बानी’ न देण्याचा निर्णय घेतला आहे. (latest marathi news)
महाराष्ट्रातचे आराध्य दैवत असलेल्या विठोबा- रुक्मिणीच्या आषाढी यात्रेनिमित्त प्रती पंढरपूर असलेल्या कळवण येथील विठ्ठल मंदिरात जिल्हा, तालुक्यातील वारकरी व भाविकांच्या दिंड्या दर्शनासाठी कळवण शहरात दाखल होतात. यंदा योगायोगाने आषाढी एकादशी व बकरी ईद एकाच दिवशी आल्याने हिंदू- मुस्लीम बांधवांनी हे दोन्ही उत्सव एकत्रित साजरे करण्याचा निर्णय घेतला. बुधवारी कळवण पोलीलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक समाधान नागरे यांनी शांतता समिती व हिंदू- मुस्लीम बांधवांची बैठक घेतली होती. नंतर शुक्रवारी कळवण येथे जामा मशिदीत मुस्लीम बांधवांची संयुक्त बैठक घेत बकरी ईदच्या दिवशी कुर्बानी न देण्याचा व मांस विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचे कळवण शहरातील नागरिकांना स्वागत केले आहे.
हेही वाचा: वीटभट्टी मजुरी ते वकिली व्हाया निर्माता, दिग्दर्शकाचा थक्क करणारा प्रवास
या वेळी हाजी हानिफ शेख, मोयोद्दीन शेख, मुस्ताक शेठ, शाबुद्दीन शेख, अंजुम मिर्झा, सलीम शहा, लतिफ शहा, हरून मनियार, रशीद मन्सुरी, सलीम तांबोळी, हा. शकील मणियार, नाझीम मिर्झा, इम्रान शेख, लायक शेख, मुजफ्फर शेख, रऊफ शेख, माजीद मोतीवाले, अकील शेक, अखिल शहा, मुस्तकीम शेख, अमीर मिर्झा, मुस्लिम बांधव व जामा मशिदीचे ट्रस्टी उपस्थित होते.
हेही वाचा: खरिपासाठी सौभाग्याचं लेणं गहाण! शेतकऱ्यांना पीककर्ज मिळेना
Web Title: Hindu Muslim Unity Meat Shops Closed Due To Ashadhi Ekadashi
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..