Ashok Kharat Case : अशोक खरातचा पाय आणखी खोलात ! फरार पत्नीची कोर्टात धक्कादायक कबुली, प्रकरणात नवा ट्विस्ट

Kalpana Kharat : कल्पना खरात १ मार्चपासून फरार असून पोलीस तिचा शोध घेत आहेत. तिने अटकपूर्व जामिनासाठी राहाता न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. तिचे वकील म्हणाले की सर्व बँक व्यवहार अशोक खरातच करत होता; कोर्टाचा निर्णय सायंकाळी अपेक्षित आहे.
Ashok Kharat Case : अशोक खरातचा पाय आणखी खोलात ! फरार पत्नीची कोर्टात धक्कादायक कबुली, प्रकरणात नवा ट्विस्ट
Updated on

नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. लैंगिक अत्याचारासह अनेकांची फसवणूक करणारा भोंदू अशोक खरात दिवसेंदिवस अडचणीत सापडत आहे. आता या प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. अशोक खरातची पत्नी कल्पना खरातने या प्रकरणात आपला कसलाही सहभाग नसल्याचं सांगत या प्रकरणापासून अंतर राखलं आहे. एवढंच नव्हे तर आपल्या पतीने अनेक गंभीर गुन्हे केले, अशी कबुली देखील कल्पना खरातने कोर्टात दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता अशोक खरातच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com