Sports Update : मनमाडच्या शिरपेचात अजून मानाचा तुरा | Latest Sports Marathi News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Trupti Parashar & Akansha Vyavhare Latest Sports Marathi News

Sports Update : मनमाडच्या शिरपेचात अजून मानाचा तुरा

मनमाड (जि. नाशिक) : मनमाडच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा रोवला असून, ताश्‍कंद (उझबेकिंस्थान) येथे होणाऱ्या एशियन युथ वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी (Asian Youth Weightlifting Championship) महाराष्ट्रातील पहिली आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती पाराशर हिची सलग तिसऱ्यांदा व जागतिक युथ स्पर्धेतील रौप्यपदक विजेती आकांक्षा व्यवहारे हिची सलग दुसऱ्यांदा भारतीय संघात निवड झाली आहे. (Asian Youth Weightlifting Championships Selection of Trupti Parashar Akanksha Vyavahare Nashik Sports News)

उझबेकिंस्थानमधील ताश्‍कंद शहरात १५ ते २६ जुलैदरम्यान या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मनमाडसारख्या छोट्या शहरातून आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रशिक्षक तृप्ती व आकांक्षाने नाशिक जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्राचा नावलौकिक वाढविला आहे.

हेही वाचा: प्रशासनाच्या चुकीमुळे NAMCO बँकेला भुर्दंड : अध्यक्ष हेमंत धात्रक

यशस्वी खेळाडूंना छत्रे विद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. जय भवानी व्यायामशाळेचे अध्यक्ष डॉ. विजय पाटील, मोहन गायकवाड, डॉ. सुनील बागरेचा, प्रा. दत्ता शिंपी, छत्रे विद्यालयाचे आधारस्तंभ पी. जी. धारवाडकर, अध्यक्ष पी. जे. दिंडोरकर, सचिव दिनेश धारवाडकर, संचालक नाना कुलकर्णी, प्रसाद पंचवाघ, मुख्याध्यापक आर. एन. थोरात, उपमुख्याध्यापक संदीप देशपांडे, पर्यवेक्षिका एस. एस. पोतदार, महाराष्ट्र राज्य वेटलिफ्टिंग संघटनेचे अध्यक्ष संजय मिसर, सचिव प्रमोद चोळकर, भारतीय व महाराष्ट्र वेटलिफ्टिंग संघाचे उपाध्यक्ष संतोष सिंहासने, गुरू गोविंदसिंग हायस्कुलचे अध्यक्ष बाबा रणजित सिंग, प्राचार्य सदाशिव सुतार यांनी अभिनंदन केले.

हेही वाचा: नांदूरमध्यमेश्‍वर पक्षी अभयारण्य सीमांकनाचा अडथळा लवकरच दूर

Web Title: Asian Youth Weightlifting Championshipsselection Of Trupti Parashar Akanksha Vyavahare Nashik Sports News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Nashiksports