Nashik : 'मविप्र' संस्थेच्या निवडणुकीसाठी इच्छुकांची धावपळ

Nilimatai Pawar
Nilimatai Pawaresakal

नाशिक : मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या निवडणुकीत (MVP Elections) यंदा विद्यमान सरचिटणीस नीलिमाताई पवार (Nilimatai Pawar) यांच्या उमेदवारीबाबत साशंकता आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील विविध ज्येष्ठ नेते, आमदारांनी श्रीमती पवार यांनी उमेदवारी करावी, यासाठी आग्रह धरला आहे. या नेत्यांनी श्रीमती पवार यांची भेट घेतल्याने हालचालींना वेग आला आहे. (Aspirants rush for MVP elections nashik news)

‘मविप्र’ संस्थेच्या निवडणुकीचा कार्यक्रम पुढील महिन्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. यंदाच्या निवडणुकीत उपाध्यक्ष तसेच दोन महिला संचालकांच्या जागा वाढणार आहेत. नुकत्याच झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत उपाध्यक्षपदाची निर्मिती करण्याचा ठराव झाला होता. या स्थितीत कार्यकारिणीचे स्वरूपच बदलणार आहे.

विद्यमान सरचिटणीस नीलिमाताई पवार यांनी आपण निवडणूक लढवणार नसल्याचे आपल्या सहकाऱ्यांना सांगितले आहे. त्यामुळे कार्यकारिणीतील पदाधिकारी, पॅनलचे पाठीराखे अस्वस्थ झाले आहेत. जिल्हाभर हा चर्चेचा विषय आहे. श्रीमती पवार विद्यमान सरचिटणीस असून, त्यांनी दोन महिन्यांत संस्थेच्या प्रमुख व ज्येष्ठ सभासदांची भेट घेऊन पाच वर्षांतील कामकाजाची माहिती त्यांना दिली आहे.

या वेळी श्रीमती पवार यांनी प्रकृती तसेच अन्य कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे आपण उमेदवारी करण्याबाबत द्वीधाःमनस्थितीत असल्याचे सांगितले आहे. या वेळी बहुतांश वरिष्ठ सभासदांनी संस्था सध्या नव्या बदलांना सामोरे जात आहेत. अनेक अपरिपक्व मंडळी विरोधी पॅनलमध्ये आहेत. त्यांच्याकडून सातत्याने खोटा व व्यक्तिगत प्रचार करून संस्थेतील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न होतो. ही परिस्थितीत पाहता, त्याचा विचार करून श्रीमती पवार यांनी संस्थेचे नेतृत्व करावे. ‘मविप्र’ ही राज्यातील आघाडीची शिक्षण संस्था आहे. सध्या संस्थेला सक्षम, अनुभवी व योगदान असलेल्यांची गरज आहे. त्यामुळे श्रीमती पवार यांनी येत्या निवडणुकीत उमेदवारी करावी, असा आग्रह धरला.

Nilimatai Pawar
Nashik : महावितरणच्या वावी उपकेंद्रात आग

दरम्यान, जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते श्रीराम शेटे सध्या संस्थेचे पदाधिकारी आहेत. महाराष्ट्र राज्य साखर महासंघ तसेच कादवा सहकारी साखर कारखान्यासह विविध संस्थांचे नेतृत्व त्यांनी यशस्वीपणे सांभाळले आहे. त्यांनी सरचिटणीस पदाची उमेदवारी करावी, असा आग्रह होता. मात्र, त्यांनीदेखील श्रीमती नीलिमाताई पवार यांनीच उमेदवारी करावी, असा आग्रह धरल्याचे कळते. चार ते पाच आमदारांनीही श्रीमती पवार यांच्याशी संपर्क करून उमेदवारी कायम ठेवावी, असा आग्रह धरल्याने त्या पुन्हा सरचिटणीस पदाची उमेदवारी करणार काय? याबाबत उत्सुकता आहे.

Nilimatai Pawar
मास्टर मॉल आग; सलग 28 तास उलटूनही आगीचा भडका कायम

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com