Nashik Crime News : काठे गल्लीत युवकावर प्राणघातक हल्ला; अल्पवयीन संशयित मुले ताब्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

assault

Nashik Crime News : काठे गल्लीत युवकावर प्राणघातक हल्ला; अल्पवयीन संशयित मुले ताब्यात

नाशिक : काठे गल्ली परिसरामध्ये पंचवीसवर्षीय युवकावर पाच जणांच्या टोळक्याने हल्ला (attack) चढविला यात जखमी युवकावर गुप्तीने वार करण्यात आले. (Assault on a youth in Kathe Galli nashik crime news)

जखमी युवकावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून या प्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येऊन दोघा अल्पवयीन संशयितांना ताब्यात घेण्यात आली आहे.

आशुतोष भोसले (वय २५; रा. सातपूर) असे जखमी युवकाचे नाव आहे. आशुतोष मंगळवारी (ता.२८) संध्याकाळी मित्रांनी बोलविले म्हणून सातपूरवरून काठे गल्ली परिसरात गेला होता, त्यावेळी संशयितांनी त्याच्याशी वाद घालून त्याच्यावर हल्ला चढवला.

हेही वाचा : नोकरदार असाल तर रोखीनंच घ्या कार

या घटनेत संशयिताने गुप्तीने आशुतोषच्या दंडावर गंभीरवार केल्याने तो जखमी झाला आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे., यात दंडाची उच्च रक्तवाहिनी कट झाल्याचे समजते घटनेची माहिती मिळताच भद्रकाली पोलिस ठाण्याचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी या प्रकरणी दोघा अल्पवयीन संशयितांना ताब्यात घेतले असून या प्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात मारण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Nashikcrimeattackassult