पर्यटकांच्या भाषेत अमोल साधतोय संवाद

तपोवनातील गोदा-कपिला संगमावर शंख खरेदीसाठी भाविकांना घालतो साद
nashik
nashiksakal

नाशिक : गोदा-कपिला संगम, राम-सीतेची झोपडी अशा विविधांगी आध्यात्मिक आख्यायिकांनी नटलेल्या तपोवनात देशभरातून पर्यटकांची मांदियाळी कायम असते. राम आणि सीता यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या पंचवटीतील तपोवन परिसरात सर्वधर्म मंदिर सर्वांचे लक्ष वेधून घेते. या मंदिरासह विविध राज्यांतून येणाऱ्या पर्यटकांना त्यांच्या बोलीभाषेत शंख विक्री करणारा अमोल कुलथे पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.

nashik
सिंधुदुर्गात कोरोनाचा कहर; रुग्ण वाढले तरी वैद्यकीय सज्जतेत होतेय सुधारणा

देश, तसेच विदेशातून येणारे पर्यटक व भाविकांना ओळखून अमोल मराठी, हिंदी, इंग्रजी, तेलगू, तमीळ, गुजराथी, कन्नड आदी भाषांचा वापर करून शंख विक्री करतो. अमोल कुलथे शंख विक्रीसह भाजीपाला विक्रीचेही काम करतो. अमोल सध्या बीएच्या प्रथम वर्षाचे शिक्षण घेतोय. भाजीपाला विक्री करीत असल्याने अमोलचा दिवस पहाटे तीनपासून सुरू होतो आणि रात्री आठपर्यंत संपतो. शंख व भाजीपाला विक्रीतून दिवसाला हजाराहून अधिक कमाई तो करतोय.

पर्यटकांचा गाइड

गोदा-कपिला संगमावर येणाऱ्या पर्यटकांना शंख विक्रीसह पर्यटकांना त्यांच्या बोलीभाषेत तपोवनातील राम-सीतेची आख्यायिका समजावून सांगण्याचे काम (गाइड) करतो. याठिकाणी येणारे भाविक कोणत्या भाषेत बोलत आहे, याचा अंदाज घेऊन त्यांना त्यांच्या बोलीभाषेत शंख खरेदीसाठी अमोल कोलथे साद घालतो. गरुड प्रकारातील शंख विक्री करतो. पर्यटकांना अमोलचे कुतूहल वाटून ते शंख खरेदीही करतात.

nashik
नाशिकच्या स्वयमला प्रधानमंत्री बालशक्ती पुरस्कार, मोदींशी संवाद साधण्याची संधी

मी माझाच बॉस

कोलथे सांगतो, मला कुठलेही व्यसन नाही. चार वेळेस पोलिस आणि आर्मी भरती केली. मात्र, त्यात अपयश आले. यात खचून न जाता भाजीपाला आणि शंख विक्रीतून दररोज हजार रुपयांपेक्षा जास्त कमावतो. आज कुठे नोकरी शोधली असती, तर माझ्या शिक्षणामुळे मला पाचशे रुपये पण कोणी दिले नसते आणि विविध भाषाही शिकता आल्या नसत्या. आज मी विविध भाषा बोलून व्यवसाय करतोय. कुटुंबाचा उदरनिर्वाह करत व्यवसाय करताना मी माझाच बॉस असल्याचे तो सांगतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com