Sarvesh Kushare
sakal
मनोहर बोचरे,देवगाव: येथील मराठमोळ्या सर्वेश कुशारेने जागतिक ॲथलेटिक स्पर्धेत इतिहास घडविला. जपानमधील टोकियो येथे सुरू असलेल्या स्पर्धेत त्याने पुरुषांच्या उंचउडीत अंतिम फेरी गाठणारा तो पहिला भारतीय ठरला. दुसऱ्यांदा जागतिक स्पर्धेत भाग घेणाऱ्या सर्वेशने २.२५ मीटर उडी मारून अंतिम तेरा स्पर्धकांत स्थान मिळविले. जागतिक स्पर्धेत सहभागी होणाऱ्या मोनिका आथरेनंतर तो दुसरा नाशिककर आहे.